Type Here to Get Search Results !

कवी सुरेश शिर्के लिखित काव्य रचना "गुरू"



 गुरू


गुरू ज्ञान सिंधू।जगी वंदनीय।

व आदरनीय।निरंतर॥१॥


गुरू एकमेव।ज्ञानाचा हा दाता।

दुःखाचा तो हर्ता।जीवनात॥२॥


गुरू हाच देतो।ज्ञानाचा प्रकाश।

करतो विकास।शिष्यांचा हा॥३॥


गुरूविन असे। ज्ञान हे अधुरे।

त्याच्याच आधारे।ज्ञान मिळे॥४॥


गुरू हाच ब्रम्हा।हाच हरिहर।

आणि सर्वेश्वर।त्रिभुवनी॥५॥


सुरेश शिर्के

खारघर,पनवेल

Post a Comment

0 Comments