Type Here to Get Search Results !

समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये बी एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाला मान्यता


प्रतिनिधी जुन्नर : प्रा. प्रविण ताजणे सर

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंग हा नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू करण्यास महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांनी मान्यता दिली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.

विद्यार्थ्यांचा नर्सिंग अभ्यासक्रमाकडे वाढता कल पाहता मोठ्या प्रमाणावरती सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या होती.आणि त्या अनुषंगाने संस्थेला नर्सिंग अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी मिळालेली आहे.

सदर अभ्यासक्रम हा महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संलग्न असणार आहे.

या नवीन महाविद्यालयासाठी अत्याधुनिक हॉस्पिटल,सुसज्ज प्रयोगशाळा,विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी स्वतंत्र वस्तीगृह,जुन्नर,पारनेर,संगमनेर,नगर,खेड,आंबेगाव,शिरूर इत्यादी प्रमुख महामार्गावरून बसेसची सुविधा संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे. 

तसेच महाविद्यालय इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी वर्गात बसण्याची व्यवस्था,प्रयोगशाळा,संगणक व्यवस्था,प्रयोगशाळेतील उपकरणे साधनसामग्री,सुसज्ज ग्रंथालय,ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तक,जर्नल्स,मॅगझिन्स,क्रिडांगण तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक आणि भौतिक सुख सुविधा संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

बी एस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी इंग्रजी,भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,जीवशास्त्र आदि विषयासह १२ वी विज्ञान शाखेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी किमान ४५ टक्के व इतर मागासवर्गीय प्रवार्गसाठी ४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र आहेत.त्यासाठी एम एच नर्सिंग २०२५ ची सीईटी परीक्षेस ५० टक्के गुण बंधनकारक आहे.

विद्यार्थी व पालक वर्गाच्या मागणीनुसार हा नर्सिंग चा अभ्यासक्रम सुरू करत असल्याचे तसेच जुन्नर,पारनेर,संगमनेर,नगर,खेड,आंबेगाव,शिरूर या भागातील विद्यार्थ्यांची फार मोठी सोय होणार आहे.

प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉ.रमेश पाडेकर-९८६७२५३३९९,यशवंत फापाळे-८६००७९७५७९ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments