दीड दमडी नाई खिसात
दीड दमडी नाई खिसात
मायबाप लाखभर वाटतं
मालं,मायबाप नावाची जायजातीत
लाखाची लखपती मीच मालं वाटतं..
आबारावून डगर वगर
मायबाप मोट डगर वाटतं
मालं,येरवक्तवर मायबापातं
छेतीस कोटी देव मालं दिसतं...
डोंगराहून डगर वगर
मायबाप बुहू डगर वाटतं
मालं,अडानी मायं बापात
सिकला मास्तर मालं दिसतं...
तपतपल्या तपनीच्या तप्यात
मायबाप ईस्त्यावानी भुजतंत
माल,कारवटलेल्या मायबापात
ईटलं रुक्माई मालं दिसतं
पाटीवरची सांबासकी
मायबापची करोडातं येक वाटतं
माल,जिंकून जग हारलो तरी
सप्पा जग जिकल्यावानी वाटतं...
रक्ताचा पानी करतं लेकरालं
मायबा, लहान्याचा मोटा करतं
मालं, दुनियेतला बायबल, पुरान,
पोतीपुरान विनाकारन वाटतं...
चरचर घामाच्या धारतं
मायबाप,हिऱ्या मोत्याची खान दिसतं
मालं,सप्प्या जगातली इस्टेट
माज्याच नावावर असल्यावानी वाटतं...
प्रा.छाया तानबाजी बोरकर
अर्जुनी/मोरगाव. जिल्हा/गोंदिया.
Post a Comment
0 Comments