प्रतिनिधी जुन्नर | प्रा. प्रविण ताजणे सर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उच्छिल येथे शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दाऱ्याघाट पर्यटन स्थळ येथे क्षेत्रभेट दौरा यशदा पुणे येथे प्रशिक्षण सुरू असणाऱ्या सर्व राजपत्रित अधिकारी वर्गांचा क्षेत्रभेट दौरा मौजे आंबोली येथे दिनांक ९ जुलै ते १६ जुलै दरम्यान पेसा क्षेत्रात असून ते गावात व परिसरात शैक्षणिक, कृषी, ग्रामपंचायत व जीवनमान आणि इतर सर्वच माहिती प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत आहेत तेथे मुक्काम करून क्षेत्रभेट करत आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा सन २०२२ मध्ये नियुक्त झालेले व वर्ग- १ पदावर नियुक्ती मिळालेले त्यात सहाय्यक आयुक्त राज्यकर जी.एस.टी.श्री.युवराज देसाई व श्री स्वप्निल पवार,तहसीलदार श्री.विजय पवार, मुख्याधिकारी नगरपालिका श्री. दिलीप बालवडकर व शिक्षण अधिकारी श्री.वैभव बाचकर आणि महिला व बालविकास अधिकारी श्री. अविनाश मगर यांचा शॉल, गुलाबपुष्प व स्वरचित बंध रेशमाचे हा काव्यसंग्रह सौ.रेश्मा रविकांत पानसरे यांनी लिहिलेला भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेस मिळालेले एक लक्ष रुपयांचे स्मार्ट टि.व्ही.यूपीएस व पोर्टेबल साऊंड या डिझीटल साहित्याचे यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले. तदनंतर शाळेतील विविध शैक्षणिक सुविधांची पाहणी करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा व मार्गदर्शन केले.
पश्चिम आदिवासी भागातील सर्व भौतिक सुविधा निर्माण करून शाळेस मिळालेले विविध पुरस्कार यात उत्कृष्ट परसबाग स्पर्धा,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार आणि अध्यक्ष चषक मानाचा पुरस्काराने शाळा गौरविण्यात आल्याने सर्व अधिकारी व मान्यवर यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि त्यांना सहकार्य करणारे ग्रामस्थ यांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आपल्या जीवनातील एमपीएससीच्या परीक्षेत कशाप्रकारे अभ्यास करावा लागतो याची माहिती व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले तसेच भविष्यात मुलांना काय बनायचे आहे याचीही चाचपणी केली मुलांनीही त्यांना प्रत्युत्तर मार्मिक दिले याचेही समाधान व्यक्त केले तसेच आम्हाला एक आदर्शवत शाळेत येण्याचा योग आला याचा आनंद झाला.
यावेळी उपस्थित अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वराज्य मित्र मंडळाचे संस्थापक मधुकर काजळे व अध्यक्ष श्री. गोविद हिंगे तर सदस्य जिजाराम सांगडे यांच्या माध्यमातून टिफीन बॅग व वह्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुभाष मोहरे व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री अन्वर सय्यद यांनी तर संयोजन सौ. स्मिता ढोबळे आणि आभार सौ. आरती मोहरे यांनी केले कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सचिन नवले, उपाध्यक्ष श्री. सागर बगाड व शिवाजी नवले आणि लक्ष्मण दाते तसेच माजी अध्यक्ष श्री. शरद नवले आणि राणी नवले, वर्षा नवले, कांचन नवले, सविता आढारी, रेश्मा केंगले, संतोष शिंदे, सुभाष बांबळे, जयराम नवले, पांडूरंग भालेराव, रविंद्र भालेराव, शंकर आढारी व ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments