गंध ओल्या प्रीतीचा
धुंद धुंद पावसात
चिंब चिंब अंग ओले
प्रीत अशी हि फुलली
गंध तिचा हा दरवळे----१
टपोरे थेंब सारे सुंदर
वाटे मोत्यासम पांढरे
ओले केस मानेवरील
मुखचंद्रकोराला पांघरे----२
अंग चोरत ते चालणे
प्रियकरासोबत हळूवार
स्पर्श शहारे अंग अंग
वारा झोंबे गार गार-----३
मदनाचा खेळ चालला
वाटे कामदेव-रतीचा
कळी कळी फुलून पसरे
गंध ओल्या प्रीतीचा-----४
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments