प्रतिनिधी घोडेगाव | सुरंजन काळे
चपटेवाडी ता. आंबेगाव, जि.पुणे दिनांक २८ जुलै २०२५ रोजी.
शिवशक्ती फाउंडेशन व जनजाती कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमानाने आदिवासी भागातील पुरुष व महिलांसाठी आरोग्य जनजागृती व चिखलीसारख्या त्वचाविकारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विशेष आरोग्य किटचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत १५० आरोग्य किट वितरित करण्यात आले. या किटमध्ये साबण, डेटॉल, औषधी मलम, स्वच्छतेसाठी उपयोगी साहित्याचा समावेश होता.
या सामाजिक उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हा मा. सरचिटणीस डॉ.ताराचंद कराळे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश काळे, रामा उद्योग समूहाचे अरविंद वळसे पाटील, चपटेवाडी गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात अरुण काठे व योगेश चपटे यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिवशक्ती फाउंडेशनचे श्रवण बढे,दुर्वेश एरंडे,प्रतीक बाणखेले, योगेश बोऱ्हाडे, पुनीत भागवत ,यश गावडे ,अमर अभंग, कौस्तुभ शिंदे ,सुरज धरम, अथर्व बाणखेले, ओंकार निघोट,शुभम महाजन,कीर्तीकुमार बढे,महेश पिंगळे, अभय सावंत, यश नांगरे, ऋषिकेश गावडे, प्रशांत भालेराव, संग्राम राजगुरू ,सचिन बढे, सुनील येवले ,कौस्तुभ सोमवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवशक्ती फाउंडेशनचा हा उपक्रम समाजाच्या आरोग्य उन्नतीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरत असून भविष्यात इतर गावांतही असे उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.
Post a Comment
0 Comments