ओली गवताची पाती
ओली ओली हिरवळ
ओली गवताची पाती
जशी भरलेल्या घरी
प्रेमभरे गोड नाती...१
आले झंजावात जरी
नाही कधी ती तुटली
मोठ मोठे वृक्ष पडे
इतिहास जमा झाली...२
ओलावा हा प्रेमसम
पवित्र प्रतिक हिरवा
ओलसर ती हिरवळ
देतो जीवना गारवा...३
जीवन असेच असावे
लिन होऊन जावे
आयुष्या सुखासाठी
जिने त्यांचे आठवावे...४
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments