Type Here to Get Search Results !

कवी सुमेध सोनवणे लिखित काव्य रचना "गुरू"



 गुरु

(अष्टाक्षरी रचना)


जगामध्ये सांगा कोणी

झाला आहे ऐसा ज्ञानी

गुरुविना ज्याची कीर्ती

दाही दिशा शुद्ध वाणी ||१||


गुरु नव्हे फक्त काया

असे सम्यक विचार

कसे जगावे जीवन

कसे असावे आचार ||२||


गुरु मार्ग देई ज्ञान

मनी सदा असो जाण

पाप पुण्य कर्म जैसे

फळं चाखे थोर सान ||३||


गुरु असे माय बाप

गुरु असे मार्गदाता

दूर होती साऱ्या व्यथा

देई बळ होई त्राता ||४||


गुरु पथा चाले सदा

तोची जाणे सत्य शोध

मिळे सारे कष्टातून

दोन घास घ्यावा बोध ||५||


सुमेध वंदना मधुकर सोनावणे.

    9967162063


*आषाढ पौर्णिमा तथा गुरु पौर्णिमेच्या मंगलमय सदिच्छा!*

🙏🙏🙏🌷🌷🌷

Post a Comment

0 Comments