Type Here to Get Search Results !

एक तपानंतर जुन्नर तालुक्याला लाभले अशोक लांडे अधिकृत गटशिक्षणाधिकारी.



जुन्नर तालुका पंचायत समिती नूतन गटशिक्षणाधिकारी पदावर तालुक्याचे भूमिपुत्र अशोक श्रावण लांडे साहेब यांनी नुकताच पदभार स्विकारला.अभ्यासू,कर्तव्यदक्ष व प्रशासकीय कामाचा अनुभव असलेले अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.यापूर्वी ते जिल्हा परिषद गोंदिया येथे उपशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होते.



जुन्नर तालुक्याला तब्बल बारा वर्षानंतर अधिकृत गटशिक्षणाधिकारी लाभल्यामुळे तालुक्यातील तमाम शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.यानिमित्ताने अशोक लांडे साहेबांचा स्वागत व सन्मान सोहळा जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व शिवजन्मभूमीतील तमाम शिक्षक बांधवांच्या वतीने पुणेरी पगडी,शाल,विघ्नहर्ता गणरायाची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.



याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर,उपाध्यक्ष विनायक ढोले,कार्यकारी सदस्य साहेबराव मांडवे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुशिला डुंबरे,पुणे जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे,जुन्नर तालुका अध्यक्ष रमाकांत कवडे,माजी अध्यक्ष रविन्द्र वाजगे,उपेंद्र डुंबरे,कार्याध्यक्ष वैभव सदाकाळ,महिला आघाडी तालुकाध्यक्ष शुभदा गाढवे,कार्याध्यक्ष उज्वला लोहकरे,प्रवक्ते राजेंद्र चिलप,प्रसिद्धीप्रमुख दिपक मुंढे,संपर्कप्रमुख संदिप शिंदे,भरत बोचरे,सदू मुंढे,संतोष पानसरे, रियाज मोमीन,सुनिल हाडवळे,कमलाकांत मुंढे,तानाजी तळपे,ललित गाढवे,प्रविण घोलप,गणेश डुंबरे,बाळासाहेब कडू,मारुती निर्मळ,गणपत लांडे,सुरेश डामसे,जीवन घोलप,गणेश वारे,सुवर्णा ढोबळे,अलका घोलप,बबन सानप,विजय नागरे,बाळासाहेब शिंदे,सोमनाथ साठे,दिपक पानसरे,रविन्द्र पानसरे,राजेंद्र फापाळे,सुनिल ठिकेकर,दिपक पाचपुते,रविन्द्र खुळे,दत्तात्रय मस्करे,सुनिल डोळस,विठ्ठल केदारी,शरद घोगरे,बाळासाहेब ठोंगिरे तसेच सर्व कार्यकारीणी सदस्य,शिक्षक पतसंस्था सभापती अनिल कुटे,उपसभापती सुनिता वामन,मानद सचिव अंबादास वामन,संचालक विजय लोखंडे,संतोष पाडेकर,जितेंद्र मोरे,पुनम तांबे,सरचिटणीस राम वायळ,उमेश शिंदे तसेच तालुका शिक्षक संघ व तालुका शिक्षक पतसंस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अधिक लक्ष घालून सर्व प्रश्न सोडविले जातील व जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यात गुणवत्तेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे अशोक लांडे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जुन्नर तालुका सरचिटणीस प्रभाकर दिघे यांनी केले तर आभार महिला आघाडी अध्यक्षा शुभदा गाढवे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments