जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा नगदवाडी ता.जुन्नर जि.पुणे या शाळेने मंथन प्रज्ञाशोध सामान्यज्ञान परीक्षा 2025 मध्ये दैदिप्यमान यश संपादन केले आहे.या शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी प्रसाद उमेश विघे याने राज्यात नववा,जिल्ह्यात चौथा व केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी शरण्या मंगेश कांबळे हिने राज्यात सतरावा,जिल्ह्यात बारावा व केंद्रात चौथा क्रमांक पटकावून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.या यशस्वी,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नगदवाडी केंद्रशाळेचे मुख्याध्यापक सखाराम शेंडकर,शिक्षक मंगेश मेहेर,पंडित चौगुले,निलेश शेलार,सुप्रिया अभंग,विद्या वाघ,आशा आरेकर व उज्वला कांबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
Post a Comment
0 Comments