Type Here to Get Search Results !

रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने आर्वी येथील शिवनेर विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन


                      

नारायणगाव आर्वी | गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री शिवनेर विद्यालय आर्वी ता.जुन्नर जि.पुणे येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच किशोरवयीन मुलांचे व मुलींचे समुपदेशन करण्यात आले अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण जोशी यांनी दिली.



विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार विद्यालयाचे माजी आदर्श विद्यार्थी,गुणवंत शिक्षक दिपक रोकडे यांच्या वतीने करण्यात आला.यावेळी किशोरवयीन मुला मुलींना रोटरी क्लब ऑफ नारायणगावच्या वतीने रोटरियन वर्षाराणी संदीप गांधी यांनी विशेष मार्गदर्शन केले.यामध्ये किशोरवयीन मुलींच्या समस्या,त्याचबरोबर त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक बदल यांना कसे सामोरे जावे याबद्दल वर्षाराणी गांधी यांनी मार्गदर्शन केले.व्यायाम व योगा नियमितपणे करावा,मोबाईल पासून कसे दूर राहावे,मोबाईलचे दुष्परिणाम काय काय आहेत तसेच विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण व आपले भविष्य यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे असे गांधी यांनी सांगितले.           


  

कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब ऑफ नारायणगावच्या वतीने सर्व मुलींना सॅनिटरी पॅडचे मोफत वितरण करण्यात आले.        

रोटरी क्लब ऑफ नारायणगावचे नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्निल जुन्नरकर,फर्स्ट लेडी अमृता जुन्नरकर,माजी अध्यक्ष संदीप गांधी,क्लब डायरेक्टर योगेश भिडे,सचिव प्रशांत ब्रम्हे,मुख्याध्यापक अरुण जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.                

कार्यक्रमासाठी बाळासाहेब गडकर,शशिकांत कुमकर,नितीन घायवट,संगीता थोरात,सुप्रिया ठाणगे,विजय पानसरे,बाळासाहेब सूर्यवंशी,अक्षदा सावंत,सोनाली भुरुक,साधना गवारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक महेंद्र तोडकर यांनी केले तर आभार रामदास गाडगे यांनी केले मानले.

Post a Comment

0 Comments