Type Here to Get Search Results !

कवी सुरेश शिर्के लिखित काव्यरचना "वर्षा सहल"

 


वर्षा सहल(पंचाक्षरी)


नित्याचे काम

रोजच असे

कंटाळा त्याने

मना होतसे-----१


काही दिवस

त्यातून सुट्टी

म्हणून कामा

करावी कट्टी-----२


वर्षा सहल

एक उपाय

वाटे नुतन

जीवन लय-----३


तोचपणा हा

सोडून मग

करा भ्रमण

धरण्या तग-----४


नै स र्गि क ता

आणण्यासाठी

वर्षानी घ्यावी

निसर्ग भेटी-----५


सुरेश शिर्के

खारघर,पनवेल

Post a Comment

0 Comments