Type Here to Get Search Results !

कवी कल्पना म्हापुसकर लिखित काव्य रचना श्रावण



सरसरसरसर रूपखणीच्या

सरी पेरीत आला श्रावण

करकच्च मिठीचा शृंगार 

मनोहर करून आला श्रावण


गडगडगडगड ढोल ढगांचा

कसा वाजवीत आला श्रावण

चमचमचमचम धार वीजेची 

पुन्हा नाचवीत आला श्रावण


हिरवाकंच शालूवर रानफुलांची

बुट्टी रंगीत घेऊन आला श्रावण

काळ्या कुरळ्या कुंतलाची छेड

वारा काढीत आला श्रावण


या..या..या..या..सख्यासयानो 

माहेराला आला श्रावण

झुला बांधून उंच फांदीला 

माहेरवाशिणीत रमला श्रावण


मोरपीसाची गाली थरथर

थुईथुई नाचत आला श्रावण

ओठांवरचा मधूपाकळी

मधुरस चाखत आला श्रावण


कल्पना दिलीप म्हापूसकर

Post a Comment

0 Comments