भवसागरात जीवन हे
असे पाण्यातील बुडबूडे
क्षणांत येतात-जातात
घ्यावे ह्यातून आपण धडे...१
कुणी इथे कुणाचा नसे
जो-तो स्वार्थासाठी पळे
अडला जीवनाचा गाडा
कसा अडखळत तो पळे...?२
आला तो कधीतरी जाणार
काय संगे तो जाणार घेऊन
सर्वकाही इथे राहणार आहे
अंती येईल निघताना कळून...३
आयुष्याच्या स्पर्धेतील चाल
कुणालाही नाही कळली कधी
जीवनाच्या त्या संध्याकाळी
नसे कधी सत्कार्याची मिळे संधी...४
सोने करण्यासाठी जीवनाचे
ध्येय्य असावे आपल्या मनी
अथक प्रयत्नात असून सतत
देह झिजवावा सत्कारणी...५
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments