रोटरी क्लब ऑफ नारायणगाव ता.जुन्नर यांच्या वतीने वर्षाविहार सहलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.अशी माहिती क्लबचे अध्यक्ष स्वप्निल जुन्नरकर व फर्स्ट लेडी अमृता जुन्नरकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या कुशीतील,वांद्रे गावाच्या जवळील पढरवाडी येथे असणाऱ्या सुरक्षित,आकर्षक,निसर्गरम्य पर्यटन स्थळाला सहकुटुंब भेट देण्यात आली.तेथील निसर्गाचे वरदान लाभलेला,निसर्गरम्य परिसर,खळखळ वाहणारे पांढरे शुभ्र पाण्याचे धबधबे या ठिकाणांना भेटी देऊन वर्षाविहार सहलीचा मनमुराद आनंद सर्वांनी घेतला.
वर्षाविहार सहलीमध्ये रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष स्वप्निल जुन्नरकर,फर्स्ट लेडी अमृता जुन्नरकर,डायरेक्टरअमित बेनके,योगेश भिडे,सचिन घोडेकर,मंगेश मेहेर,डॉ.हनुमंत भोसले,संदिप गांधी,हेमंत महाजन,डॉ.पियुष कुलकर्णी,तेजस वाजगे,प्रशांत ब्रह्मे,प्रसाद बांगर,भरत चिलप,अनिता शिंदे,डॉ.सीमा जाधव,डॉ.केतकी काचळे,धनश्री बेनके,अमृता भिडे,प्रिया घोडेकर,निर्मला मेहेर,डॉ.सविता भोसले,वर्षा गांधी,सिमा महाजन,डॉ प्रियंका कुलकर्णी,रेखा ब्रम्हे,अश्विनी वाजगे,पल्लवी बांगर,माधवी चिलप,कृतिका बांगा आदि सर्व सभासद व कुटुंब सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वर्षाविहार सहलीचे आयोजन व नियोजन क्लबचे अध्यक्ष स्वप्निल जुन्नरकर,फर्स्ट लेडी अमृता जुन्नरकर,अमित बेनके,धनश्री बेनके,तेजस वाजगे व अश्विनी वाजगे यांनी उत्कृष्टपणे केले.
Post a Comment
0 Comments