Type Here to Get Search Results !

श्री शिवछत्रपती महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत "हर घर तिरंगा अभियान"



विशेष प्रतिनिधी | प्रा. निलेश आमले सर

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील दुर्गम आदिवासी भागात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात १०० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवला .दि ११ ऑगस्ट २०२५ रोजी हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत कुकडेश्वर,नाणेघाट या ठिकाणांची निवड करण्यात आली.श्रावणी सोमवारचे औचित्य साधून कुकडेश्वर या प्राचीन पुरातन शिवकालीन मंदिराला भेट देण्यासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी स्वयंसेवक व प्राध्यापकांनी मानवी साखळीच्या माध्यमातून जागरूकता निर्माण केली तसेच नाणेघाट या ठिकाणी येणाऱ्या निसर्ग पर्यटकांमध्ये मानवी मनोरा तयार करून तिरंगा विषयी जागरूकता निर्माण केली. याप्रसंगी भाविक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.या मोहिमे अंतर्गत श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मानवी साखळी,स्वच्छता अभियान, घरोघरी राष्ट्रीय ध्वज वाटप करून राष्ट्रीय एकात्मता या मूल्याची जोपासना करण्याचा विशेष प्रयत्न केला. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे यांनी प्रोत्साहन दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे व अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी यांनी स्वयंसेवकांचे कौतुक केले. या उपक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ.महेंद्र कोरडे, डॉ सुप्रिया काळे,प्रा.जयश्री कणसे, प्रा.विष्णू घोडे,प्रा.मयूर चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments