अकोले जि. अहिल्यानगर (प्रतिनिधी) अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील शेतकरी शेतमजूर नवकवी प्राध्यापक आनंदा कालू ऊर्फ काशिनाथ डावरे सर यांचा 'शेतशिवार' हा द्वितीय काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित होत आहे. त्याचा भव्य प्रकाशन सोहळा नामांकित अतिथींच्या उपस्थितीत अकोले जिल्हा अहिल्यानगरच्या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे नाव 'मुक्या झाडांच्या कविता हे असून त्या काव्यसंग्रहास नामांकित कवी माननीय मंगेश पाडगांवकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. त्याचा भव्य प्रकाशन सोहळा सन १९८४ साली अकोले संगमनेर स्नेहवर्धक संघटना मुंबई या संस्थेतर्फे सायन हॉल मुबई या ठिकाणी संपन्न झाला होता. नामांकित कवी कुसुमाग्रज, विं.दा. करंदीकर, मंगेश पाडगांवकर, दया पवार, नारायण गंगाराम सुर्वे, दैनिक नवशक्तीचे संपादक पु.रा. वेहरे, दैनिक गावकरीचे संस्थापक संपादक दादासाहेव पोतनीस, दैनिक ठाणे वैभवचे संस्थापक संपादक नरेंद्र बल्लाळ, कवी सुरेश भट गोदाताई परूळेकर इत्यादी नामांकित कवी लेखकांचा त्यांना दिर्घकाळ सहवास लाभला आहे.
अत्यंत संयमी आणि चिंतनशील व्यक्तीमत्व म्हणजे प्राध्यापक आनंदा डावरेसर यांना जन्मजातच काव्य प्रतिमा शक्ती लाभल्याने इयत्ता पाचवीत असतांनाच त्यांची 'पेहरामाई' ही कविता अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 'शिक्षणदिप माषिकात प्रकाशित झाली आणि तेव्हापासून त्यांनी विविध दैनिके, पाक्षिके, मासिके आणि विविध दिवाळी अंकातून सातत्याने लेखने केले आणि अजूनही ते वांङमय सेवेत कार्यमग्न आहेत.
एस.एस.सी. सुटल्यानंतर स्वतःच्या उदनिर्वाहासाठी त्यांच्या मित्रांनी आग्रह केल्यानंतर मुंबई सारख्या महाकाय नगरीमध्ये त्यांनी सहा वर्षे वास्तव्य केले. पूर्णवेळ इंडोफील कंपनी आणि अर्धवेळ दैनिक ठाणे वैभव मध्ये त्यांनी नोकरी केली. पण कायम स्वरूपी नोकरी न मिळाल्याने पुनः त्यांनी आपल्या शेती व्यवसायाकडे लक्ष दिले. नंतर त्यांनी संगमनेर कॉलेज, अकोले कॉलेज, सिन्नर कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान त्यांनी विविध दैनिके
आणि दिवाळी अंकातून सातत्याने कथा, कविता, लेख लिहिले अनेक कथा, कविता आणि लेखांना विविध वाङमयीन पुरस्कार देखील मिळाले आहेत. 'डोह आणि इतर कथा' या अप्रकाशित कथासंग्रहास त्यांच्या राज्यपातळीवरील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार देखील मिळाला आहे. मुंबई आकाशवाणी. पुणे आकाशवाणी दोन दोन वेळा काव्यवाचन कार्यक्रम देखील प्रसारीत झाले आहेत. सन १९८६ साली मुंबई दुरदर्शनवर त्यांची अभ्यासपूर्ण मुलाखत देखील झाली आहे. अहमदनगर सध्याचे नवे नाव अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माननीय यशवंतरावजी गडाख साहेव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असतांना कवीवर्य सुरेश भट यांच्या हस्ते त्यांचा गुणगौरव सोहळा देखील झाला आहे.
सन १९७० सालापासून सातत्याने ललितलेखन करणारे प्रा. आनंदा डावरे यांचा नुकताच प्रकाशित होणारा 'शेतशिवार' हा द्वितीय काव्यसंग्रह होय. पुण्यातून प्रकाशित झालेला 'आश्रम' कथासंग्रह आणि 'डोह आणि इतर कथा' हा कथासंग्रह देखील सध्या प्रकाशनाच्या मार्गावर आहे. डोह, विंचू, घरटे, दप्तर, वाप, बंडूचे राज्य, भूकवळी इत्यादी कथांना त्यांच्या राज्यपातळीवरील प्रथम क्रमांकाची पारितोषीके देखील मिळालेली आहेत.
सन १९९० सालापासून ते 'आंतरभारती' नावाचे साप्ताहिक आणि मासीक प्रकाशीत करीत आहेत. आंतरभारती नावाचे मासीक तर नवोदीत कवी, लेखक यांना त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठच स्थापन केले आहे.
अकोले तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या 'निंव्रळ' या छोटयाशा खेडयात त्यांचा एका गरीव शेतकरी कुटुंबात जन्म झाला. सात बहिणी आणि एक भाऊ असा त्यांचा मोठा कुटुंब परिवार असल्यामुळे वालवयातच संपूर्ण कुटुंबाची जवाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. मग एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी व्यवसायानिमित्त त्यांना मुंबई येथे जावे लागले. पण कायमस्वरूपी नोकरी न मिळाल्याने पूर्ण शिक्षण घेण्याचा त्यांनी निर्धार केला. मग एम.ए. (इतिहास), एम.ए. (राज्यशास्त्र), एम.ए. (मराठी), बी.एड, एम.एड, एम. फील हे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. सध्या ते पी.एच.डीचे संशोधन कार्य करीत आहेत.
सध्या 'मुक्या झाडांच्या कविता' (काव्यसंग्रह), आश्रम (कथासंग्रह), शेतशिवार (काव्यसंग्रह) ही तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आणि 'डोह व इतर कथा' (कथासंग्रह) सायपन (कादंबरी) मंगल मेल्याची गोष्ट (कादंबरी), सांजराधा (काव्यसंग्रह), आठवणींचे रावे (काव्यसंग्रह), पांढरा घोडा आणि एक मुस्लीम माणूस (कथासंग्रह) अशी एकूण ६ पुस्तके त्यांची प्रकाशीत होत आहेत.
त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितले की, माझ्या या साहित्य सेवेस अनेक नामांकित कवी, लेखक, नाटककार आणि नामांकित शिक्षण संस्थांनी फार मोठा
हातभार लावला आहे. त्यात संगमनेर कॉलेजचे माजी प्राचार्य माननीय कौंडिण्यसर, सत्यनिकेतन संस्थेचे सेक्रेटरी माननीय रा.वि.पाटणकर साहेव, साने गुरूजी शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी माननीय भा.वी. जोशी सर. माजी आदिवासी विकास मंत्री नामदार मधुकरराव पिचड साहेव, माजी आमदार यशवंतराव भांगरे साहेब, माजी पाटबंधारे मंत्री वी. जे. खताळ पाटील यांचे सदैव शुभ अशिर्वाद मिळाले म्हणून आजपर्यंत मी हे सतत ललित लेखन करीत आहे.
तसेच माझी काव्य प्रतिभा सतत जागृत ठेवण्यासाठी शेतकरी नेते माननीय दशरथजी सावंत, नामदार बाळासाहेव थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, वाळासाहेव विखे पाटील, मंगेश पाडगांवकर, कवी कुसुमाग्रज, नारायण गंगाराम सुर्वे, दया पवार, वर्ल्ड व्हिजन टाइम्स, मुंबई दैनिकाचे मुख्य संपादक माननीय नागेश हुलवळे सर, राजेश साबळे सर, दैनिक ठाणे वैभव, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, नवशक्ती, पुणे सकाळ, नाशिक गांवकरी, दैनिक लोकमत, दैनिक सार्वमत, दैनिक पुढारी यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. असेही प्राध्यापक आनंदा डावरे सर यांनी मुलाखतीच्या शेवटी आवर्जून सांगितले. तसेच आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजुर, सत्यनिकेतन शिक्षण संस्था राजुर, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी अकोले, साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड, गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक, हिंद सेवा मंडळ अहिल्यानगर इत्यादी शिक्षण संस्थांचे त्यांनी आवर्जून ऋण व्यक्त केले आहेत. त्यांच्या 'शेतशिवार' या काव्यसंग्राहाच्या भव्य प्रकाशन सोहळयास आमच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा व्यक्त करीत अहोत. जय हिंद! जय महाराष्ट्र !!
..शुभेच्छूक....
१. सर्व मित्रपरिवार, आंतरभारती एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तसेच सर्व माजी विद्यार्थी - महाराष्ट्र राज्य. २. सर्व मित्र परिवार मुंबई शहर


Post a Comment
0 Comments