विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र पोलीस विभाग,जुन्नर पोलीस स्टेशन व श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर शहरांमध्ये अमली पदार्थ विरोधी तसेच तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समाजामध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता तरुणाईला विळखा घालू पाहत असलेले अमली पदार्थांचे सेवन या विरोधात जनजागृती करण्यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमली पदार्थांचा वापर न करणे,आदर्श तरुण पिढी निर्माण करणे हे या उपक्रमाचे ध्येय असल्याचे कार्यक्रम अधिकारी डॉ.एम.एस.कोरडे यांनी अधोरेखित केले.केंद्र शासनाच्या हरघर तिरंगा अभियानांतर्गत विविध उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवण्यात आले असून आज स्वातंत्र्यदिनी तिरंगा रॅलीचे आयोजन जुन्नर शहरांमध्ये करण्यात आले. समाजामध्ये जाज्वल्य राष्ट्रप्रेम व राष्ट्र अभिमान निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी यांनी राबवले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाघमारे यांनी दिली.
नशेमुळे सामाजिक स्वास्थ्य,व पर्यायाने समाज व देशाची हानी होते.नशा तरुणांना वैफल्यग्रस्त करते आणि त्यातून गुन्हेगारी वाढीस लागते म्हणून त्यापासून मुक्ती मिळवण्या साठी समाजातील सर्व घटकांनी नशा मुक्त राहण्याचे आव्हान जुन्नर पोलीस स्टेशनचे श्री धनंजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर उपविभाग यांनी तरुण पिढीला केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गटकुळ साहेब, पोलीस उपनिरीक्षक श्री ऋषि तिटमे व पोलीस कर्मचारी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मा ॲड.संजय काळे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
या उपक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ.महेंद्र कोरडे,डॉ सुप्रिया काळे,प्रा.जयश्री कणसे, प्रा.विष्णू घोडे,प्रा मयूर चव्हाण तसेच राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख कॅ.डॉ.बाबासाहेब माने यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment
0 Comments