Type Here to Get Search Results !

श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे 14 ऑगस्ट "विभाजन विभिषिका स्मृती दिन साजरा "



विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर

 श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत सर्व स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी इतर प्राध्यापक वृंद यांच्यामार्फत 14 ऑगस्ट या दिनी विभाजन विभिषिका स्मरण दिन साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 मध्ये नवजात भारत आणि पाकिस्तान या दोन वेगवेगळ्या राष्ट्रांचे विभाजन झालेल्या या दिनाचे स्मरण करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे यांनी दिली.

 कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.शरद मनसुख यांनी सर्व स्वयंसेवकांना इतिहासातील बलिदान व आत्म आहुती देणाऱ्या महात्मा व वीरांचे स्मरण व स्मृति करण्याचे आवाहन केले तसेच स्वातंत्र्य प्राप्ती पर्यंत लाखो लोकांच्या कुटुंबांचे विस्थापन,नुकसान आणि वेदनांचे स्मरण त्यांनी अनेक उदाहरण व दाखल्यांच्या माध्यमातून दिले.संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय काळे यांनी भारतीय इतिहासातील हिंसाचार, उपद्रव,आतंकवाद,दंगल यांचा निषेध करत या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी यांनी या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.महेंद्र कोरडे,डॉ सुप्रिया काळे,प्रा. जयश्री कणसे,प्रा.विष्णू घोडे,प्रा मयूर चव्हाण यांनी केले.

Post a Comment

0 Comments