Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्य दिनी डिसेंट फाउंडेशनने केले ज्येष्ठाना आधार काठ्यांचे वाटप.



प्रतिनिधी जुन्नर : प्रा. प्रविण ताजणे सर

दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य पथक राजुरी नं - २ येथे डिसेंट फाउंडेशन पुणे व आदिवासी शिक्षण संस्थेचे सचिव देवराम मुंढे यांच्या माध्यमातून राजूर मधील पन्नास ज्येष्ठ नागरिकांना आधार काठ्यांचे वाटप करण्यात आले. 



तसेच उपस्तित ज्येष्ठ नागरिकांच्या बी पी व शुगरच्या तपासण्या करण्यात आल्या.यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई व संचालक आदिनाथ चव्हाण यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा.एकनाथ डोंगरे ,सरपंच ज्योत्सना मुंढे ,उपसरपंच शांताराम मुंढे ,

कार्यक्रमाचे नोयोजन डॉ .प्रदीप गोसावी व परिचारिका यांनी केले. पोलिस पाटील रामदास मुंढे ,यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments