प्रतिनिधी मंचर | प्रा. अनिल निघोट सर
निघोटवाडी येथे श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गोकुळनगरी निघोटवाडीतील अखंड हरिनाम सप्ताहाचे हे ११९ वे वर्ष असून ग्रामस्थ, भाविकांच्या प्रचंड उत्साह व भक्तीमय वातावरणात सप्ताह पार पडला.
निघोटवाडीतील या सप्ताहाची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू असुन पंचक्रोशीतील शेकडो भाविकांची उपस्थिती आणि निघोटवाडी ग्रामस्थ, मुंबई पुणे कर बाह्य ग्रामस्थांची उपस्थिती हे या सप्ताहाचे वैशिष्ट्य आहे.
निघोटवाडी मुंबईकरांचे श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ स्थापना १९४९ हे ही अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असुन गोकुळ अष्टमी निमित्त अखंड ७५ वर्ष भजनसेवा या मंडळाने आपल्या गावात व तपनेश्वर मंदिर मंचर येथे दिली आहे.
गोकुळ अष्टमी निमित्त हभप परमेश्वर महाराज फपाळ यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले.भव्य भजनस्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या,ज्यात अनेक भजन मंडळे सहभागी झाली होती. याशिवाय भाविकांसाठी अन्न प्रसाद ठेवण्यात आला होता.मंदिरांच्या दोन्ही बाजूला बांधलेल्या दहिहंडी फोडायला युवकांनी मोठी गर्दी केली होती. निघोटवाडीची मुख्य यात्रा असल्याने पैपाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.याशिवाय खेळणी ,कटलरी, ओली भेळ,भांडी, शो च्या वस्तुंच्या दुकानांत लहान मुले , युवती महिलांची मोठी गर्दी ओसंडून वाहत होती.यानिमित्ताने बाहेर गावी रहाणारे निघोटवाडीकर आवर्जून उपस्थित असल्याने एकमेकांची ख्याली खुशाली विचारत मित्रमंडळींच्या भेटीगाठी घेताना दिसत होते.
समस्त निघोटवाडी ग्रामस्थांनी ऊत्तम आयोजन करून यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी केलेले नियोजन उत्तम होते.
Post a Comment
0 Comments