आपल्याकडे सर्वसाधारणपणे रविवार हा सुट्टीचा दिवस मानला जातो, या दिवशी शाळा, कॉलेजेस, बॅंका, सरकारी खाजगी कार्यालये बंद असतात. मात्र रविवारीच सुट्टी असण्या मागचे कारण माहीत आहे का?
रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून का घोषित करण्यात आला? भारतीयांना मिळाणाऱ्या रविवारच्या सुट्टेमागे मराठी माणसाचा सिंहाचा वाटा आहे. या सुटीचा इतिहास काय?
इंग्रजांच्या काळात मीलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना सातही दिवस काम करावे लागत असे, त्यांना सुट्टी मिळत नसे. आठवड्यात हक्काची एकही सुटी मिळत नसे, त्याकाळी ब्रिटिश अधिकारी रविवारी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात असत. मात्र कामगारांसाठी अशी काही परंपरा नव्हती.
कामगारांचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ मध्ये मुंबईत बॉम्बे मिल हॅण्ड्स असोसिएशन स्थापना केली. त्यांनी इंग्रजा समोर साप्ताहिक सुट्टीचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावात त्यांनी असे नमूद केले की, आम्ही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी सहा दिवस काम करतो. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी एक दिवस आम्हाला देशाची सेवा करण्यासाठी तसेच काही सामाजिक कामे करण्यासाठी मिळावा.
नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी तब्बल सात वर्ष रविवारच्या सुट्टीसाठी लढा दिला. २४ एप्रिल १८९० रोजी लोखंडे यांच्या नेतृत्त्वाखाली हजारो मिल कामगारांनी मोर्चा काढला. लोखंडे यांनी केलेला तीव्र संघर्षाची दखल घ्यावी लागली. मिल मालकांनी बैठक घेऊन रविवारच्या सार्वजनिक सुटीची मागणी मान्य केली. १८८४ मध्ये रविवारच्या सुट्टीसाठी सुरू झालेला संघर्ष १० जून १८९० रोजी संपला.
*नारायण मेघाजी लोखंडे*
भारतीयांना हक्काची रविवारची सुट्टी मिळण्यात एका मराठी व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे. सरकारी क्षेत्रा बरोबरच खाजगी क्षेत्रातही रविवारच्या सुटीचं नातं जोडलं गेलेय ते भारतातल्या कामगार चळवळीचे पहिले नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळेच.
१८८४ मध्ये लोखंडे यांनी कामगारासाठी लढा दिला. त्यांचा लढा तब्बल सात वर्ष चालला. यादरम्यान त्यांनी अनेक आंदोलने केली. अखेर १० जून १८९० रोजी इंग्रंज सरकारने भारतीयांना रविवारची सुट्टी जाहीर केली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्या नंतरही भारतामध्ये आजही रविवारची सुट्टी आहे.
लोखंडे यांना ट्रेड यूनियन आंदोलनाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. लोखंडे महत्मा फुले यांचे जवळचे सहकारी होते. २००५ मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने पोस्टाचे तिकीट जारी केले होते.
सर्वसाधारणपणे ज्या देशांवर ब्रिटिशांनी राज्य केले त्या देशांमध्ये रविवार हा सुटीचा दिवस असतो. पाश्चिमात्यांचा आठवडा सोमवार ते शनिवार असाच असतो आणि त्यामुळे सहा दिवस काम केल्यावर ते सातव्या दिवशी सुटी घेतात.
रविवार दिनाच्या सर्व कामगारांना मनःपूर्वक शुभेच्छा.....!!
🌹🌷🌹🌷🌹
प्रा.डॉ.घ.ना.पांचाळ,
राष्ट्रीय सरचिटणीस
तथा
महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क
अधिकारी
मराठी साहित्य मंडळ.
☘️🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️
Post a Comment
0 Comments