प्रतिनिधी जुन्नर | प्रा. प्रविण ताजणे सर
रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ व रोटरी क्लब ऑफ पुणे फार ईस्ट यांच्या आर्थिक सहकार्याने ग्लोबल ग्रँट कामधेनू 9वा प्रकल्प या अंतर्गत जुन्नर तालुक्यातील गावांमध्ये महिला शेतकऱ्यांना गायी घेऊन देण्यात आल्या. याच उपक्रमाचा भाग म्हणून तांबे या गावामध्ये पशुधन व्यवस्थापन व व्यवसाय विकास याविषयी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला, असे शिव विद्या प्रतिष्ठान या अंमलबजावणी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक संतोष वंजारी यांनी सांगितले.
'रोटरी क्लब ऑफ पुणे फार ईस्ट' च्या रो. पंकज पटेल व सर्व सदस्यांच्या पुढाकारने तांबे, अंबोली व घाटघर येथे ग्रामविकासाचे कार्य सातत्याने चालू आहे. महिला शेतकरी व शेतकरी कुटुंबांसाठी आर्थिक सक्षमीकरण या उद्देशाने रोटरी कामधेनू गोपालन प्रकल्प अनेक वर्षे पुणे विभागात राबविण्यात येत असून रो. कुमार शिनगारे व रो. किशन भगवानानी यांचे मार्गदर्शन व विविध रोटरी क्लब यांचा सहभाग असे या ग्लोबल प्रकल्पाचे वैशिष्ट आहे, असे संस्था प्रमुख शिल्पा कशेळकर यांनी नमूद केले.
प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पशुधन पर्यवेक्षक डॉ.विनायक गाडेकर सर यांनी साध्या सोप्या भाषेत शेतकऱ्यांना पशुपालन, लसीकरण, आजार निवारण, पशुआहार, चारा व्यवस्थापन, दूध गुणवत्ता, व्यवसाय दृष्टिकोन इ. विविध मुद्द्यांवर विस्तृतपणे मार्गदर्शन केले. तसेच यावेळी डॉ.सुमित कोरडे सर, डॉ गोविंद गायकवाड सर यांनी ही पशुधन विभागाच्या उपक्रमांबद्दल सांगितले.
केंद्र शासनाच्या ' प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना'(PMFME) .या योजनेला भेटणारे अनुदान , प्रशिक्षण, ऑनलाइन अर्ज भरणे, योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यांची माहिती आकाश गाडे-जिल्हा संसाधन व्यक्ती ,पुणे जिल्हा यांनी या योजने विषयी सहभागींना सविस्तर माहिती दिली.
तांबे गावाचे आर. सी. सी. अध्यक्ष सुनिल मिंडे यांनी ही प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विशेष संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments