प्रतिनिधी जुन्नर | प्रा. प्रविण ताजणे सर
अनेक अर्थाने हा दिवस अभिमानाचा ठरला. रॅली ते सांस्कृतिक कार्यक्रम हा संपूर्ण कार्यक्रम उत्तम नियोजन
भव्य दिव्य रॅली ,तरुणांचा उत्साह ,राजकीय ,सामाजिक,पक्ष व संस्था ,संघटना एकत्र येऊन एकच कार्यक्रम रॅली आणि एकूणच कार्यक्रम ,यामुळे शहरात समाजाचे भव्य शक्तिप्रदर्शन दिसले. शालेय विद्यार्थी,आणि तरुण वर्ग यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.श्री विठ्ठल जोशी सर ,श्री अंकुश कोकणे सर,श्री बाळासाहेब लांघी सर,यांनी उत्तम सूत्रसंचलन केले श्री दत्ताभाऊ गवारी यांनी प्रास्ताविक एका वेगळ्या उंचीवर मांडले, समाजातील वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला. प्रथमच सर्व समाजाला प्रास्ताविकाच्या रूपात प्रत्येकाच्या मनाला साद घालणारा विषय ऐकता आला.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते डॉ.तुकाराम रोंगटे सर होते. रोंगटे सर म्हणजे आदिवासी समाजाचे वैभवशाली रत्न .
रोंगटे सर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित सर्वांची मने जिंकून घेतली.त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने खरोखर आपण आदिवासी असल्याचा अभिमान प्रत्येकात निर्माण झाला.आदिवासी म्हणजे निसर्ग पूजक,संस्कृतीची राखण करणारा होय.मोहेंजोदडो ते शिवाजी महाराज असा समर्थ ऐतिहासिक साक्ष असलेला समाज म्हणजे आदिवासी समाज.संपूर्ण पृथ्वीवर मूलनिवास असलेला समाज हा आदिवासी समाज आहे,याची पुन्हा एकदा सर्वांना जाणीव करून देणारे मार्गदर्शन आज ऐकायला मिळाले.
नाचणारे म्हणून वापर करून देऊ नका,तर जग आपल्या तळावर नाचले पाहिजे असा कृती कार्यक्रम करा असे आवाहन त्यांनी सर्व तरुण वर्गाला केले प्रमुख वक्ते यांचा परिचय श्री मेमाणे सर यांनी करून दिला.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री अतुलदादा बेनके यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याचे लवकरच अनावर करू असा विश्वास त्यांनी सर्वांना दिला. शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आदिवासी संस्कृतीचे परंपरागत वैभव. लोकनृत्य आणि इतर कार्यक्रमाने आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा ते वैभव सर्वांना जाणीव करून देत होते.
जेवणाची उत्तम व्यवस्था .या वर्षीचा कार्यक्रम म्हणजे मागील वर्षाचे पेक्षा अनेक पटीने उत्तम होता या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नोकरदार वर्गाने केले होते.नियोजन हेवा वाटेल असे होते.यातून सर्व राजकीय नेते बोध घेतील अशी अपेक्षा .कार्यक्रमाचे निमित्त समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना सन्मान चिन्ह देऊन एक वेगळ्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिवनेर भूषण पुरस्कार आदिवासी समाजाला मिळत नाही ,एवढ्या एकाच गोष्टींचा खेद वाटत होता.या कार्यक्रमाचे निमित्त ज्येष्ठ नेते तुळशीराम भोईर श्री काळू शेळकदे ,श्री मधुकर काठे, श्री तुळशीराम भोईर , श्री रावते,यांच्या नियोजनाखाली सर्व कार्यक्रम पार पडला.
अनेक तरुण नेते उत्साहाने सहभागी झालेले दिसले, ॲड ललित जोशी,निलेश रावते,असे असंख्य.हा कार्यक्रम म्हणजे जुन्नर तालुक्यातील तमाम आदिवासी शक्तीचे आणि एकीचे प्रदर्शन ठरावे असा होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक गावातील अनेक तरुण,ज्येष्ठ या वेळेस स्वतः सहभागी होते.शालेय विद्यार्थी,शेतकरी,नोकरदार,अधिकारी वर्ग ,सर्वांचे उपस्थितीमुळे कार्यक्रम खूपच यशस्वी झाला. या कार्यक्रमाच्या आभार सुनील विरणक सर यांनी मानले.
Post a Comment
0 Comments