प्रतिनिधी जुन्नर | प्रा. प्रविण ताजणे सर
जुन्नर तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा व राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापन संघाच्या वतीने व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांच्या हस्ते करण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष प्रवीण ताजणे यांनी दिली.
याप्रसंगी डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये गोड मेडल मिळवलेल्या तालुक्यातील अर्णव लोखंडे व राष्ट्रीय पातळीवर विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेला प्रत्यूष माने , राज्य पातळीवर दिव्यांग गटात प्रथम आलेला सोहम नलावडे व नीट परीक्षेत आदिवासी समाजात राज्यात प्रथम आलेल्या स्नेहल दिवटे आदींचा सत्कार गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच एस.एस.सी परीक्षेत तालुक्यात गुनानुक्रमे प्रथम तीन क्रमांक असलेले ओजस्वी सराईकर, अनुश्री उचगावकर, मोरे समिधा, हांडे आर्या यांचा सत्कार सन्मान चिन्ह व पुस्तके देऊन संघातील कार्यकारणीच्या वतीने करण्यात आला असल्याची माहिती सचिव प्रकाश जोंधळे यांनी दिली.
जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असून विविध स्पर्धांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा केलेला सत्कार हा त्या विद्यार्थ्यांना भविष्यात प्रेरणादायी ठरेल आणि हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांनी व्यक्त केले याप्रसंगी जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर केंद्रे ,वीरेंद्र काळे, तालुका समन्वयक प्रमोद जाधव , योगेश शेळके , खोडद येथील हवामान शास्त्रज्ञ सुधीर फाकटकर, खोडद ग्रामीण विज्ञान केंद्राच्या सदस्या सुरेखा फाकटकर यांसह शिक्षक व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव तुषार आहेर यांनी तर आभार खजिनदार व्यंकट मुंडे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments