Type Here to Get Search Results !

सुराळे | सायकल बॅंक सुरु करुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे स्वातंत्र्यदिन साजरा.....

 


वार्ताहर सुराळे | शरद शिंदे

आज स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथील विद्यार्थ्यांनी वाद्यांच्या गजरात प्रभातफेरी काढून ग्रामपंचायत व शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न केला. ग्रामपंचायत ध्वजारोहण सदस्या सौ.शेवंता केदारी व सौ. पुष्पा केदारी यांचे शुभहस्ते तर प्राथमिक शाळा ध्वजारोहण श्री.अशोक खंडू मातेले (पोलिस पाटील ) यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सर्वांनी राष्ट्रध्वजाची व एकल महिला सन्मानाची प्रतिज्ञा घेतली. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. रमेश रामचंद्र मातेले हे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर देशभक्तीपर गीते व भाषणे सादर केली. सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गजानन पाटील साहेब यांनी आवाहन केल्यानुसार शाळेमध्ये सायकल बॅंक सुरु करुन सुराळे ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने शाळेत तीन किलोमीटर अंतरावरुन येणारी गरीब व गरजू विद्यार्थीनी कु. वैशाली दत्तात्रय नायकोडी हिला सुमारे पाच हजार रुपये किंमतीची सायकल प्रदान करण्यात आली.



तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व श्री. कुलस्वामी को- ऑप. सोसायटीचे संचालक मा. संतोषशेठ चव्हाण यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना स्कूलबॅग वाटप करण्यात आले. माजी सेवानिवृत्त शिक्षक मा. धोंडू श्रीराम जुन्नरकर गुरुजी यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वह्या, चित्रकला वही, कंपासबाॅक्स व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

शाळेसाठी मदत करणा-या देणगीदारांचे सन्मान करण्यात आले. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सौ. प्रियांका सचिन शेटे व आशा सेविका श्रीमती छाया भास्कर मातेले यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच श्रीमती कविता बाबाजी शेटे, श्रीमती सुनिता अजित चव्हाण, श्रीमती रुपा बन्सी महाबरे यांचा एकल महिला म्हणून सन्मान करण्यात आला. शाळेतील शिक्षिका श्रीमती मंगल मरभळ यांचाही आदर्श शिक्षिका म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. खंडेराव ढोबळे व पदवीधर शिक्षक श्री. पंढरीनाथ उतळे यांनी कायम ठेव योजनेसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपयांची देणगी दिली. तसेच शाळेसाठी प्रस्तावित सांस्कृतिक सभागृह बांधकामासाठी सन २००४ च्या बॅचच्यावतीने पाच हजार रुपये देणगी देण्यात आली. यापूर्वी अनेक ग्रामस्थांनी सभागृहासाठी देणग्या दिलेल्या असून सर्व माजी विद्यार्थ्यांनी देणग्या देऊन सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.



याप्रसंगी स्वप्निल मातेले, उपसरपंच ॲड. सचिन चव्हाण व खरेदी विक्री संघाचे संचालक रामदास चतुर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच निता घोगरे, लक्ष्मण मातेले, नानाभाऊ मातेले, यशवंतराव चव्हाण, बन्सी चतुर, शिवाजी मातेले, दशरथ मातेले, अंकुश चव्हाण, महेंद्र चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष शेटे, उत्तम शेटे, मधुकर मातेले, राम शेटे, प्रविण मातेले, ग्रामसेविका अश्विनी आजादे, माधुरी जाधव तसेच माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, विविध पदाधिकारी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना खाऊवाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. खंडेराव ढोबळे यांनी, *नियोजन शाळेतील शिक्षक मंगल मरभळ, सुनिल डोळस, अंगणवाडी सेविका शिला मातेले, गिता शेटे यांनी केले व पदवीधर शिक्षक पंढरीनाथ उतळे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments