प्रतिनिधी | प्रा. प्रविण ताजणे सर
आज ७९ वा स्वातंत्र दिन १५ ऑगस्ट २०२५ यानिमित्ताने सन २०२३ पासून समस्त ग्रामस्थ व पालक आणि शालेय व्यवस्थापन समिती यांनी ठरविले आहे की, आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून शिक्षण घेऊन पुढे इयत्ता दहावी मध्ये सर्वाधिक गुणांकन प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते दर १५ ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण करण्याबाबतचा निर्णय आहे व या ही वर्षी शाळेतील गुणवंत विद्यार्थी यश सत्यवान शिंदे इयत्ता दहावी उच्छिल गावात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दलबद्दल त्याच्या शुभहस्ते शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले. अशा प्रेरणादायी संकल्पनेमुळे भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व जिल्हा परिषदेच्या शाळा टिकाव्यात एवढेच नव्हे तर मुलांना अभ्यासात गोडी लागावी व आपण भविष्यामध्ये मोठ्या पदावर जाण्याची जिद्ध उराशी बाळगून त्या अनुषंगाने तयारी करणे या केवळ एकाच उदात्त हेतूने शाळेतील सर्व मुलांना प्रेरणा स्फुर्ती मिळावी व आपल्याही हातून आपल्या स्वतःच्या शाळेचे ध्वजारोहण एक दिवस व्हावे यासाठी आपण देखील खूप मेहनत अभ्यास करून भविष्यात अधिक चांगले गुण मिळवून आपल्या हस्ते शाळेतील ध्वज फडकावा अशी प्रेरणा समस्त ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समिती आणि येथील सर्व शिक्षकवृंदांच्या माध्यमातून गावातून शिक्षण घेणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांकरीता हा प्रेरणादायी संदेश देण्यात येत आहे या निर्णयाचे कौतुक गावातून व परिसरातून तसेच पुणे-मुंबई या ठिकाणी राहणाऱ्या गावातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज कॅनरा बँक आपटाळे या बँकेचे शाखा व्यवस्थापक मा.विशालजी यादव, बॅकेचे अधिकारी हितेश मानकर व महेश भांभेरे या सर्व बॅक अधिकारी यांच्या वतीने शाळेत मुलींसाठी कॅनरा बॅकेची असणारी योजना शौचालय युनिट करीता ह्या शाळेची निवड करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल येथे सन २०२५//२६ या शैक्षणिक वर्षात रुपये २ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच काम सुरू होईल असे सांगितले आहे.
रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या माध्यमातून रोटरीयन अध्यक्ष सुनिल जाधव व नुतन अध्यक्ष मिलिंद घोडेकर यांच्या शुभहस्ते शाळेतील १३ विद्यार्थ्यांनीना सायकलचे वाटप करण्यात आले तर मुलांना गेले सन २०१८ पासून सात वर्ष शैक्षणिक साहित्याचे वाटप वह्या, पेन, व इतर साहित्याचे किटचे साई फेटा मेकर्स युवराज शांताराम शिंदे यांच्याकडून करण्यात आले आहे.
ग्रुप ग्रामपंचायत उच्छिलचे लोक नियुक्त सरपंच श्री मंगेश आढारी सदस्य श्री दशरथ नवले व सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी श्रीम अश्विनी साबळे यांनी देखील सर्व राष्ट्रपुरुष व क्रांतिकारकाचे फोटो व सर्व शाळेतील मुलांसाठी खाऊ दिला देण्यात आला त्यांचे आभार मानण्यात आले
उच्छिल शाळेस प्रगतीपथावर व यशाच्या शिखरावर आणि पश्चिम भागातील एक सर्वगुणसंपन्न मॉडेल स्कूल केल्याबद्दल व शाळेत चाललेले शैक्षणिक कार्य यासाठी उपस्थित सर्वांनी शाळेचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले व सन्मान केला आणि भविष्यात शाळेच्या शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर शाळेत बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते या बालसभेचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष शरद नवले यांनी भूषविले होते. यात विद्यार्थी भाषणे ग्रामस्थ मनोगतात आत्माराम शिंदे यांनी शुभेच्छा व मार्गदर्शन केले अध्यक्षीय मनोगतात शरद नवले यांनी सांगितले की, भविष्यात शाळा टिकल्या तरच गावची प्रगती होईल यासाठी सर्वांनी प्रयत्नशीत राहावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत उच्छिल गावचे बबन मारुती नवले, पोलिस पाटील सुनिल बगाड, मा, चेअरमन गणपत बांबळे संचालक गुलाब आढारी व बापू नवले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन नवले, उपाध्यक्ष सागर बगाड, जगदिश नवले, सुदाम नवले, ज्ञानेश्वर शिंदे,सदस्य संतोष शिंदे, पांडूरंग भालेराव, कांचन नवले, सविता आढारी यांच्यासह पालक सदस्य श्री देवेश नवले, शिवाजी नवले मा.उपाध्यक्ष गणपत भालेराव, हरिभाऊ शिंदे, अशोक नवले, कुंदन बगाड, निलेश नवले, युवराज भालेराव, अविनाश आढारी, विकास शिंदे, किशोर नवले, मयूर शिंदे, सतिश नवले, सोमनाथ केंगले, सागर बांबळे, अंगणवाडी सेविका संगीता शिंदे योगिता केंगले विमल करवंदे हिराबाई नवले वैद्यकीय अधिकारी डॉ.सुप्रिया कानडे, टी. टी. मेमाणे, स्वप्तील मांडवे, नूतन साबळे, शोभा नवले कावेरी शिंदे व सत्यवान शिंदे, यांच्यासह गावातील अनेक महिला मंडळ तरुण मंडळ व पालक तसेच ग्रामस्थ ध्वजारोहणला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद यांनी तर अनुमोदन आरती मोहरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार स्मिता ढोबळे यांनी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुभाष मोहरे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments