प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागल्याची माहिती प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी दिली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये समर्थ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत यश संपादन केले आहे.
विभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे:-
कॉम्प्युटर इंजिनियरिंग:-
प्रथम क्रमांक-
श्रुती खानदेशी-९.९३ एस जी पी ए
द्वितीय क्रमांक-
देवेश आगळे-९.८५ एस जी पी ए
तृतीय क्रमांक-
पूजा भोर-९.८५ एस जी पी ए
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनियरिंग:-
प्रथम क्रमांक-
निकीता सरोदे-९.३२ एस जी पी ए
द्वितीय क्रमांक-
रेवती वीर-९.१० एस जी पी ए
तृतीय क्रमांक-
दिया जठार-९.०३ एस जी पी ए
सिव्हिल इंजिनिअरिंग:-
प्रथम क्रमांक-
प्रतिक्षा चासकर-९.०३ एस जी पी ए
द्वितीय क्रमांक-
अविनाश भालेराव-८.८७ एस जी पी ए
तृतीय क्रमांक-
सागर साळवे-८.५५ एस जी पी ए
मेकॅनिकल इंजिनियरिंग:-
प्रथम क्रमांक-
शितल वाळे-८.५३ एस जी पी ए
द्वितीय क्रमांक-
शरद वाळे-८.४ एस जी पी ए
तृतीय क्रमांक-
विक्रम सरोदे-८.२ एस जी पी ए
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग:-
प्रथम क्रमांक-
पायल कुरंदळे-८.४० एस जी पी ए
द्वितीय क्रमांक-
काजल कुरंदळे-८.१८ एस जी पी ए
तृतीय क्रमांक-
ऋतुजा पिठोरे-७.८३ एस जी पी ए
प्रथम श्रेणीमध्ये ५१ विद्यार्थी तर विशेष प्राविण्यासह १२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी दिली.
सदर विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी,प्रा.स्नेहा शेगर,प्रा.अमोल खतोडे,प्रा.अमोल भोर,प्रा.निलेश नागरे,प्रा.शुभम शेळके,प्रा.प्रमोद गोपाळे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments