Type Here to Get Search Results !

समर्थ संकुलात अभियंता दिन विविध कार्यक्रमांनी साजरा.



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इंजिनियर्स डे म्हणजेच "अभियंता दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भारताचे महान अभियंता जलसिंचन क्षेत्रातील क्रांतिकारक विचारवंत तसेच भारतरत्न पुरस्काराने सन्मानित डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.विद्यार्थी व शिक्षकांनी अभियांत्रिकी व्यवसायातील त्यांचे योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अभियांत्रिकी शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून ती समाजाला दिशा देणारी सर्जनशीलता आहे.अभियंते हे देशाच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत.विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत संशोधन,नवकल्पना आणि समाजोपयोगी प्रकल्प यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

 अभियांत्रिकी दिनाच्या निमित्ताने अभियांत्रिकी क्षेत्रातील नव्या संधी-स्टार्टर्स,रोबोटिक्स तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता यावर विशेष कार्यशाळा घेण्यात आली.

विविध तांत्रिक स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता व कौशल्ये प्रदर्शित केले.

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल थ्रू इनोवेशन या विषयावर प्लॅनेट स्मार्ट सिटी पुणे या संस्थेचे प्रमुख समाधान शेवंती व गणेश गवांदे यांचे प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील नवनवीन संकल्पनाची माहिती दिली.विद्यार्थ्यांसाठी रोबोरेस स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते.यामध्ये 32 संघांनी सहभाग घेतला होता.

सिव्हिल विभागाच्या वतीने टॉवर मेकिंग कॉम्पिटिशन चे आयोजन करण्यात आले होते.

इलेक्ट्रिकल विभागाच्या वतीने, चिरकाल टिकणाऱ्या हाताने बनवलेल्या वस्तू चे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

अभियंता प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला चालना देण्यात आली.

मेकॅनिकल विभागाच्या वतीने मेकॅनिकल क्षेत्रातील नोकरीच्या संधी या विषयावर प्रकाश देशपांडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन समर्थ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,विभागप्रमुख प्रा.शुभम शेळके,प्रा.अमोल खतोडे,प्रा.शेगर मॅडम,प्रा.निर्मल कोठारी,प्रा.निलेश नागरे,प्रा.अमोल भोर यांनी केले.

अभियंता दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांसाठी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments