Type Here to Get Search Results !

हाके व वानखेडे विरोधात मराठा समाज आक्रमक!



घोडेगाव दि.१७ सप्टेंबर आंतरजातीय विवाहासंदर्भात जातीयतेवर आधारित अवमानकारक व भडकाऊ विधाने केल्याबाबत लक्ष्मण हाके व संगिता वानखेडे यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते व मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात केलेल्या बेताल वक्तव्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधवांनी घोडेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन निवेदन देऊन या दोघांविरोधात जातीय तेढ निर्माण करत असल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पवारसाहेब यांनी चौकशी करून कारवाई चे आश्वासन दिले. यावेळी अखंड मराठा समाज आंबेगाव तालुका व संलग्न संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  मराठा समन्वयक बाबाजी चासकर, स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हाप्रमुख प्रा.अनिल निघोट आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा.सुरेखाताई निघोट, तालुकाप्रमुख विवेक पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे,मराठा सेवक बाळासाहेब रोडे,आशिष घोलप, माऊली पाटील, गणेश खानदेशे, संतोष पवार ,अनिकेत काळे, सिद्धेश काळे, विकास गायकवाड, वैशाली पवार, पुष्पा रोडे,ऊत्तम जाधव, संजय चिंचपुरे,शांताराम जाधव,शंकर भेके व मराठा समाजाचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments