अर्जुनी मोरगाव : मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया अंतर्गत संस्थापक सचिव छाया बोरकर यांनी आपल्या"अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून आपण समाजाचे देणं लागतो या भावाने प्रेरित होऊन छाया तानबाजी बोरकर यांनी वाढदिवसानिमित्त १५ सप्टेंबर २०२५ रोजी अखिल भारतीय परिवर्तन मातोश्री जिजाऊ परिषदेचे ऑनलाईन कवी संमेलन आणि पुरस्कार सोहळा जेतवन साहित्य समूह, नालंदा विश्व समूह अशा अनेक समूहातून ऑनलाईन कविसंमेलन व पुरस्कार सोहळा आयोजित करून अर्जुनी मोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शासकीय आरोग्य प्राथमिक विभाग अर्जुनी मोरगाव येथे रुग्णांना आपल्या परीने काही मदत करून वाढदिवस साजरा केला.
सन्माननीय आदरणीय सर्व मान्यवर यांनी वाढदिवस सर्वांच्या आयुष्यात दरवर्षी येणारा खास महत्त्वाचा दिवस आणि आनंदाचा दिवस ईश्वराने बहाल केलेला आहे. सुंदर पहाट ,सुंदर दिवस एका एका दिवसाने, वर्षाने आयुष्य हे वाढत जाते" असे म्हणतात की, किती जगावे यापेक्षा मिळालेले आयुष्य कसे जगावे हे ज्याला कळाले, त्याने आयुष्य कमावले "अशा व्यक्तीची गणना असामान्य अशा व्यक्तीमध्ये होते अशी असामान्य व्यक्तीमत्व म्हणजे माझी प्रिय मैत्रीण छाया हिच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले.
तर सावित्री शेवाळकर नांदेड जेतवन चॅरिटेबल ट्रस्ट बुद्ध संस्थापिका सावित्री शेवाळकर नांदेड, यांनी आपल्या साहित्य समूहातून छाया बोरकर यांच्या अभिष्टचिंतन निमित्त ऑनलाइन कवी संमेलन आयोजित केले तर नालंदा विश्व साहित्य समूहच्या संस्थापिका प्रतिभा केदार यांनी तीन दिवसीय ऑनलाईन काव्य संमेलन आयोजित करून एक आगळावेगळा इतिहास रचून अखिल भारतीय परिवर्तन मातोश्री जिजाऊ अर्जुनी मोरगाव अंतर्गत संस्थापिका यांनी ऑनलाईन कवी संमेलन पुरस्कार सोहळा आयोजित केला असून २५ जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अर्जुनी मोरगाव येथील १/४ वर्गाला वह्या पेन्सिल खोट रबर दिले तर सावरटोला येथील सावरटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एक ते चार विद्यार्थ्यांना सुद्धा बुक पेन्सिल चाकलेट दिल तर शासकीय प्राथमिक रुग्णालय अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथील रुग्णालयात रुग्णांना बिस्किट पाकीट देऊन जीवनातील आनंद विद्यार्थी वरून सामाजिक कार्याला हातभार लावून वाढदिवस साजरा केला.
सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी प्राध्यापक छाया बोरकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत जि प प्राथ शाळा अर्जुनी मोर क्रमांक २ येथील विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला.
विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन्सिल तसेच चॉकलेट देऊन आपल्या वाढदिवसाच्या आनंद द्विगुणीत केला
त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका कु. इंदिरा एस महादाने तसेच शाळे च्या सहायक शिक्षिका जनबंधू मॅडम, ताम्रकार मॅडम यांनी त्यांचे आभार मानले.





Post a Comment
0 Comments