Type Here to Get Search Results !

श्री राधेश्याम दिव्यांग संस्थेच्या वतीने जागतिक मुकबधीर दिन साजरा



जुन्नर तालुक्यातील श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप व प्रहार जनशक्ती जुन्नर तालुका च्या वतीने जागतिक मुकबधीर दिव्यांग दिन दिनांक 28 सप्टेंबर रोजी श्री राधेश्याम संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण व श्री अरुण शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता आज समाजा मध्ये ज्या लोकांना बोलता येत नाही ऐकू येत नाही अश्या लोकांना समाजात अत्यंत हिन दर्जा ची वागणूक दिली जात आहे त्यानां बोलता व ऐकु येत नसल्याने त्यांना कोणीही लवकर रोजगार नोकरी देत नाही या लोकांवर उपासमारीची वेळ येत आहे शासनाच्या वतीने या लोकांना कोणते रोजगार उपलब्ध नाही मिळे ते काम करण्याची तयारी असते परंतु या लोकांना रोजगार मिळत नाही तसेच लोकांना अनेक ठिकाणी बोलताना व हावभाव करताना लोकाचा गैरसमज होवू या लोकांची व समाजातील लोकांच्या मारहाण भांडण होतात या करिता संस्थेच्या वतीने मूकबधिर लोकांच्या सांकेतिक भाषेचा फ्लेक्स व भिंतीवरील फ्लेक्स तयार करण्यात आले असून सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये बस स्थानक पोलीस ठाण्यात व. रुग्णालयात लावण्यात येणार आहे तसेच मुकबधीर लोकांनी आपल्या भाषेत आपल्या अडचणी मांडले कार्यक्रमात जागतिक मुकबधीर दिनाच्या शुभेच्छा केक लहान मुलांच्या हस्ते कापुन साजरा करण्यात आला तसेच गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण शेरकर यांनी सागितले कि लवकरच मुकबधीर लोकांना स्वयंरोजगारासाठी त्यांना प्रक्षिशण देवून आर्थिक साहय करुन रोजगार सुरु करण्यात येणार आहे 

या वेळी संस्थापक अध्यक्ष श्री दिपक चव्हाण श्री अरूण शेरकर अध्यक्ष मुकबधीर संघटना चे अध्यक्ष श्री मुस्तकिम पिरजादा ,महीला अध्यक्षा ताहेरा आत्तार मजहल सौदागर युसुफ सय्यद लखन डाडर मुबिन कागदी उमेर इनामदार फाईक कागदी अतुल भालेकर गिता मोरे वसिम शेख सागर घोणे सकिणा पिरजादा Acne फाउंडेशन चे अध्यक्ष श्रीकांत जाधव अनिल शेटे आत्तार व दिव्यांग बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments