प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
जारकरवाडी तालुका आंबेगाव येथील सहाव्या माळेच्या हभप दौंडकर महाराज यांच्या किर्तनास शेकडो भाविकांनी भर पावसात हजेरी लावली.
आरतीचे मानकरी म्हणून शिवसेना जिल्हासमन्वयक आणि स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा सुरेखाताई निघोट, जिल्हाप्रमुख प्राचार्य अनिल निघोट आणि ग्रामस्थांनी आरती केल्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे ऊत्तम नियोजन व व्यवस्था प्रसिद्ध अनाऊंसर निवृत्ती भांड, रविंद्र भांड,सोसायटीचे सचिव नवनाथ मंचरे, अविनाश तागड,मा.सरपंच सोनाली भांड,कचर मंचरे, प्रमोद पाचपुते, मंगेश भोसले ,भागा भांड तसेच युवक मंडळी व जारकरवाडी ग्रामस्थांनी केले.
यावेळी हभप दौंडकर यांनी भक्तीमार्गाचे महात्म्य सांगताना ज्ञानोबा, तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांचे दाखले दिले.
प्रा.सुरेखाताई निघोट यांनी पैसे किती यापेक्षा संस्कार कीर्ती हे महत्त्वाचे असुन छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज तसेच अहिल्यादेवी होळकर हे आपल्या कार्याने अजरामर आहेत,त्यांचा आदर्श ठेवून प्रत्येकाने कार्यरत रहावे असे आवाहन केले.





Post a Comment
0 Comments