प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
शुक्रवार दिनांक २६/०९/२०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये सर्वानुमते शंकर घोडे यांची म.ए.सो. सेवक पगारदार सहकारी पतसंस्था पुणे येथे बिनविरोध एकमताने चेअरमन पदी निवड करण्यात आलेली आहे. १९३७ साली स्थापन झालेल्या पतसंस्थेत हजारो सदस्य आहेत. अ दर्जा प्राप्त असणाऱ्या पतसंस्थेचे नावलौकिक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र मध्ये आहे. सभासदांच्या हिताचे व गरजा तसेच दूरदृष्टी लक्षात घेऊन निर्णय घेतले जातात. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या ब्रीद वाक्या प्रमाणे सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन पतसंस्थेमध्ये एकमताने निर्णय घेतले जातात. सभासदांना मध्यम मुदतीचे कर्ज, तातडी कर्ज, काटकसर ठेव कर्ज, सन समारंभ कर्ज अशा अनेक प्रकारचे कर्ज दिले जातात. पतसंस्थेत एकूण १५ संचालक असून एक कार्यवाह व चार कर्मचारी आहेत. पतसंस्थेमध्ये सभासदांनी निवडून दिलेले संचालक हे पतसंस्थेचे विश्वस्त म्हणून पाच वर्षे प्रमाणिकपणे काम करतात. शंकर घोडे यांची चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरांमधून त्यांचे कौतुक होत आहे. सदर सभेस माजी अध्यक्ष उमेश लांडगे यांनी नवनियुक्त अध्यक्ष शंकर घोडे यांच्या नावाची घोषणा केली. या वेळी माजी उपाध्यक्ष महेश रासकर, ज्येष्ठ संचालक रोहिदास भारमळ, सुनील जोशी, कांता इष्टे,संजय थोरात,सागर भिसे,संतोष मारणे,विजय चक्रवती,अविनाश गोरे,राजेंद्र कांबळे,विनोद पारे,संतोष शेळके,राजश्री रणपिसे कार्यवाह रेश्मा पाटील,कर्मचारी गणेश फडकले,किशोर साठे,कांचन भुजबळ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह रेश्मा पाटील यांनी केले तर आभार संचालक श्री. सागर भिसे यांनी मानले. सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली.

Post a Comment
0 Comments