एक सर्वसाधारण कुटुंब त्या कुटुंबात वडील माध्यमिक शिक्षक आई गृहिणी या दांपत्यांना तीनही मुली व एक मुलगा असं त्यांचं छान कुटुंब. मोठ्या मुलीचे नाव गौरी, मधली चे नाव लक्ष्मी, लहानीचे सरस्वती आणि त्यांचा छोटा बंधू प्रथमेश. या तिघी बहिणी खूप जिद्दी आणि कष्टाळू कारण या शेतकरी कुटुंबात व सांप्रदायाचा वारसा असलेल्या घराण्यात लहानाच्या मोठ्या झाल्या. मराठी माध्यमातूनच शिक्षण घेऊ लागल्या शिक्षण घेत असताना बाबांची शिकवण, वडिलांची शिकवण, व आईची शिकवण या सर्वांच्या शिकवणीमुळे त्यांचे व्यक्तिमत्व फुलू लागलं. शिक्षण चालू असतानाच त्या शेतातील कामे, घरकाम, सडा, सारवण, रांगोळी ही सगळी आईची लहानपणापासूनच शिकवण त्यामुळे त्यांच्या ते अंगवळणी पडले होते. तसेच त्यांची जिद्द मात्र कायम होती दिलेले काम वेळेत पूर्ण करणे व जोमाने अभ्यासही करणे आपल्या लहान भाऊ प्रथमेशची देखील काळजी घेणे शेतातील फुले तोडणे त्यांचे जुड बांधणे रोप लावणे, गवत कापणी ही सर्व कामे त्यांना आवडीने करायला आवडत. मोठी गौरी सर्व भावंडांची जबाबदारीने काळजी घेत असे तसेच ती चुलीवर स्वयंपाक करणे इतर कामे देखील आनंदाने करू लागली. प्रत्येक काम लहानपणापासूनच त्या तिघी बहिणी आवडीने करायच्या मोठी गौरीची शाळा पूर्ण झाल्यानंतर ती सायकलवर कॉलेजला जाऊ लागली कारण बस वेळेवर मिळत नव्हती अंतर जरी दूर होतं तरी ती जात असे घरात आईला मदत करून मग ती कॉलेजला जाऊ लागली तिला देखील त्या सर्व कामांची आवड निर्माण झाली. काम करताना आई सर्व व्यवस्थित समजून सांगत असे तसेच बरोबर या तिघीही लक्षात ठेवू लागल्या एका पाठोपाठ तिघीही सर्व कामात तसेच अभ्यासात देखील हुशार होत्या गौरीच्या मागे लक्ष्मी देखील शाळा पूर्ण झाल्यावर सायकलवर कॉलेज करू लागली सरस्वती देखील शाळेत हुशार होती तिचा वर्गात नव्हे तर शाळेत पहिला नंबर येत असे गौरी आणि लक्ष्मी ग्रॅज्युएट झाल्या आणि गौरीला पाहण्यासाठी पाहुणे येऊ लागले पण वडील मात्र सांगू लागले की मी एक शिक्षक आहे मला माझ्या मुलीला शिकवायचे आहे उच्चशिक्षित करायचे आहे असे म्हणून त्यांनी पुढील शिक्षणासाठी गौरीला संमती दिली त्यानंतर गौरीचा पुणे विद्यापीठांमध्ये डिग्री साठी मेरिटमध्ये नंबर लागला तेव्हा सुद्धा ती केळीच्या शेतात आपल्या आईबरोबर आणि बहिणींबरोबर काम करत होती. मेरिटमध्ये नंबर लागला हे ऐकताच तिच्या डोळ्यातनं आनंदाश्रू वाहू लागले सगळ्यांनाच आनंद झाला होता गौरी शहरांमध्ये पुणे विद्यापीठात डिग्री करू लागली आणि तिच्या पाठोपाठ लक्ष्मी देखील उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरात आली तिच्या पाठोपाठ लहान बहिण सरस्वती देखील इंजिनिअरिंग करू लागली. अशा तऱ्हेने तिघीही उच्चशिक्षित झाल्या त्यांच्या पाठोपाठ त्यांचा लहान भाऊ प्रथमेश देखील इंजिनीयर झाला त्याने देखील आपल्या बहिणींची म्हणजेच तिघींची प्रेरणा घेतली होती हे सर्व शक्य झाले ते फक्त आणि फक्त त्यांचे आई-वडील व आजोबांच्या शिकवणीमुळे व संस्कारामुळे. आज गौरी व लक्ष्मी उच्च माध्यमिक शिक्षिका आहेत तर सरस्वती व प्रथमेश इंजिनियर आहेत.
लेखिका-प्रा. पल्लवी निलेश रासकर.
श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर.

Post a Comment
0 Comments