प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने आज सोमवार दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे उपशिक्षणाधिकारी संजय काळे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा केली शिष्टमंडळाचे नेतृत्व पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाष मोहरे व राज्य संयुक चिटणीस तथा मा.अध्यक्ष शिवाजीराव वाळके यांनी केले चर्चेमध्ये मध्ये प्रामुख्याने - १)बदली झालेल्या शिक्षक बांधवांना तात्काळ कार्यमुक्त करणेबाबत...
ग्रामविकास विभाग व बदली कक्ष यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या बदल्यांबाबत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात निम्म्याहून अधिक बदली प्रक्रिया ही यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. परंतु ऑनलाईन बदली पोर्टल प्रक्रिया ही सर्वत्र एकसारखी होणे अपेक्षित असताना,आपल्या पुणे जिल्ह्यात द्विद्धा परिस्थिती निर्माण झाली आहे.आम्ही संघटनेच्या वतीने आपणांस आग्रहाची विनंती करतो की,मा. महोदय आपण राज्य बदली अभ्यास गटाचे अध्यक्ष आहात त्यामुळे यावर आपण तातडीने निर्णय घ्यावा व दिनांक २३/०९/२०२५ रोजीच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आपणाकडे अपील करणाऱ्या शिक्षकांना तथा न्यायप्रविष्ट असलेल्या शिक्षक बांधवांना वगळून उर्वरित सर्व संवर्गातील शिक्षक बंधू-भगिनी यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात यावे.
२) ऑनलाईन शैक्षणिक कामाचा सुरू असणारा भडीमार...
माहे जुलै-२०२५ पासून सातत्याने दैनदिन माहिती देणे, लिंक भरणे यांसह इतर माहितीचा अतिशय मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या वतीने कामकाज सुरू आहे. यास्तव संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत की,शिक्षण विभागाच्या वतीने फक्त माहितीसाठी स्वंतत्र्यरित्या शैक्षणिक ॲपची निर्मिती करण्यात यावी. याच धर्तीवर पंचायत समितीच्या रिक्त असणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटरची तातडीने भराव्यात. त्याचप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेस परिणाम न होण्याच्या दृष्टीने प्रत्येक समूह साधन केंद्रावर कंत्राटी पद्धतीने संगणकीय डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करावी.
३)३० सप्टेंबर २०२५ च्या पटसंख्येवर संच मान्यता करत असताना U-DIES Plus याकरीता आधार वर करत असताना त्यासाठी कॅम्पचे नियोजन करणे, आधार बाबत SO2 व SO3 यातील तांत्रिक अडथळे दूर करून त्यात योग्य तो निर्णय घ्यावा.
४)जिल्ह्यातील सर्वच दिव्यांग बांधवांना समानतेचा न्याय व हक्क मिळावा याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी.
५) समाजशास्र पदवीधर शिक्षक बांधवांना इतर तथा कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे मा.प्राथमिक शिक्षण संचालनालय सो पुणे यांच्या १६/०७/२०२४ च्या पत्रान्वये विषय बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या सर्व समाजशास्त्र शिक्षकांना सरंक्षण देण्यात येऊन त्यांना अतिरिक्त दाखवण्यात येऊ नये. ते ज्या शाळेवर कार्यरत असतील त्या शाळेवर रिक्त असलेल्या विषय शिक्षकाची नेमणूक करण्यात येऊ नये.
६) निवड श्रेणी करीता स्वंतत्र यंत्रणा मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सो यांनी केले असून त्याबाबत शिक्षण विभागाने तात्काळ कार्यवाही करून याबाबतचे प्रस्ताव व परिपत्रक जारी करण्यात यावे.
६)पेसा व बिगर पेसा क्षेत्रातील नवनियुक्त शिक्षकांचे गेले पाच महिन्यांपासूनचे रखडलेले मानधन मा.संचालक महोदय प्राथमिक यांचे पत्र जा.क्र. ८८/२०२५ व २२ जुलै २०२५ नुसार व ९५/२०२५ रोजीचे दिनांक ५ ऑगस्ट २०२५ चे पत्र आणि महाराष्ट्र शासन निर्णय १०२५/ दिनांक २५ सप्टेंबर २०२५ अनन्वे तात्काळ अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.
६) आदिवासी बहुल तालुक्याकरीता स्वंतत्र्यरित्या गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षक बंधू-भगिनी यांजसाठी पेसा क्षेत्राकरीता राज्याप्रमाणे स्वतंत्र "आदिवासी शिक्षक पुरस्काराची" कार्यवाही करण्यात यावी.
८) जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार बाबतची कार्यपद्धती जाहिर करण्यात यावी. त्यामधील निकषानुसार निवड प्रक्रिया राबवली असल्यास मूल्यांकन समितीने योग्य परीक्षण करून मूल्यमापनाची एक प्रत संबंधित शिक्षकांस तात्काळ देण्यात यावी. हे करताना सदरचे मूल्यमापन हे पारदर्शी व निपक्षपातीपणे व्हावे ही अपेक्षा असून याबाबत कार्यालयाने केलेली कार्यवाही लेखी स्वरूपात कळवावी ही विनंती.
१०) मागील शैक्षणिक वर्षातील भविष्य निर्वाह निधीची स्लिप अद्यापही प्राप्त झाली नाही त्यात दिरंगाई होत आहे. त्याबाबत त्वरित कार्यवाही करून सर्व शिक्षक बंधू भगिनींना ती मिळण्यास विनंती आहे.
१२) प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) निवडणूक विषयक निरंतर चालणाऱ्या कामातून वगळण्यात यावे सदरचे हे अशैक्षणिक काम शिक्षकांस देऊ नये याकरीता स्वंतत्र यंत्रणा तथा इतर विभागातील यंत्रणेमार्फत मार्फत करण्याबाबतची शिफारस मा. जिल्हाधिकारी सो यांच्या कार्यालयाकडे करावी..
१३)सेवानिवृत्त झालेल्या आमच्या पेन्शनर शिक्षक बंधू- भगिनी यांचे अंशदान राशिकरण व उपदान अनुदान तरतूद ही तात्काळ मिळण्याबाबत कार्यालयाकडून योग्य ती कार्यवाही व्हावी.
१४)नवीन शासन निर्णयानुसार सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून ओळखपत्राचे वाटप करण्यात यावे तसेच सेवानिवृत्त शिक्षक बांधवांनाही कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबतची कार्यवाही करावी.
१५)जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांना कॅशलेस विमा योजना सुरू करण्यात यावी.
१६)नियमितपणे जिल्हा संघटना पदाधिकारी यांच्या सहविचार सभेचे आयोजन करावे तसेच हे करताना जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शिक्षक संघटनांना निमंत्रित करण्यात यावे.
याप्रसंगी अनिल महाजन उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, किरण गावडे मा.जिल्हाध्यक्ष, सुरेश थोरात जिल्हा सरचिटणीस, अशोक पठारे तालुकाध्यक्ष शिरूर, बाळासाहेब टेमगिरे अध्यक्ष हवेली, जालिंदर दिघे उपाध्यक्ष पुणे जिल्हा, तुकाराम हगवणे उपाध्यक्ष पुणे जिल्हा, ज्ञानदेव दाभाडे संघटक पुणे जिल्हा,रामदास गवारी सरचिटणीस जुन्नर तालुका,म. ना.शेख मावळ व श्री.आ. का.मांडवे सल्लागार हे उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments