Type Here to Get Search Results !

समर्थ ज्युनिअर कॉलेजची इशिता काकडे रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी व सीताबाई थिटे फार्मसी कॉलेज शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ जुनियर कॉलेज बेल्हे ची इयत्ता अकरावी मधील इशिता काकडे हिने शालेय नेमबाजी स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्या वैशालीताई आहेर व क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी दिली.

 तसेच बापूसाहेब आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र निमगाव केतकी तालुका इंदापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे बांगरवाडी येथील विघ्नेश पवार या खेळाडूने ८७ किलो वजनी गट ग्रीको रोमन या कुस्ती प्रकारात द्वितीय क्रमांक तर जीवन बांगर या विद्यार्थ्याने १३० किलो वजनी गट ग्रीको रोमन या कुस्ती प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला.



 लोणी देवकर या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय मुलींच्या कुस्ती स्पर्धेत समृद्धी जाधव हिने ७६ किलो फ्रीस्टाइल मध्ये द्वितीय क्रमांक तसेच दीक्षा गाडगे ६२ किलो फ्रीस्टाइल मध्ये द्वितीय क्रमांक, वैष्णवी गायखे ५९ किलो फ्रीस्टाइल मध्ये तृतीय क्रमांक मिळवला.

टाकळी हाजी ता.शिरूर या ठिकाणी झालेल्या मुलींच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये समर्थ ज्युनिअर कॉलेजचा तृतीय क्रमांक आला असून दीक्षा भोर या खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

 जेजुरी तालुका पुरंदर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये समर्थ गुरुकुल व समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे येथील गौरी चौधरी ३४ किलो वजनी गट तृतीय क्रमांक,साई दिघे ४५ किलो वजनी गटामध्ये तृतीय क्रमांक, श्वेता मटाले ५२ किलो वजनी गट तृतीय क्रमांक,श्रद्धा दिघे ५६ किलो वजनी गटामध्ये तृतीय क्रमांक,विघ्नेश पवार ८५ किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक संपादन केला.

या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा संचालक एचपी नरसुडे, क्रीडाशिक्षक सुरेश काकडे, विनायक वराडी, महेंद्र गुळवे व राहुल अहिरे यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments