शिक्षक दिनानिमित्ताने रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने जुन्नर तालुक्यातील विविध शाळांतील गुणवंत शिक्षकांचा सन्मान नारायणगावात करण्यात आल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष स्वप्निल जुन्नरकर व फर्स्ट लेडी अमृता जुन्नरकर यांनी दिली.
नारायणगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या रोटरी गुणवंत शिक्षक सन्मान सोहळ्यात शिक्षक वृंदांचा सन्मान जुन्नर तालुका गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे,ग्रामोन्नती मंडळ नारायणगावच्या विश्वस्त मोनिकाताई अनिलतात्या मेहेर,नारायणगाव कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.आनंद कुलकर्णी,जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष युवा नेते अमितशेठ बेनके,रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष स्वप्निल जुन्नरकर,पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी अनिता शिंदे,बालक मंदिर नारायणगावच्या मुख्याध्यापिका सुनिता पारखे,क्लबचे सेक्रेटरी प्रशांत ब्रह्मे,व्होकेशनल डायरेक्टर संदिप गांधी,फर्स्ट लेडी अमृता जुन्नरकर,रोटरी क्लब नारायणगावचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी जुन्नर तालुका गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे,विश्वस्त मोनिकाताई मेहेर,प्राचार्य प्रा.डॉ.आनंद कुलकर्णी,युवा नेते अमितशेठ बेनके,अध्यक्ष स्वप्निल जुन्नरकर या मान्यवरांनी आपले प्रेरणादायी विचार व्यक्त केले.पुरस्कारार्थींच्या वतीने मानसी भालेराव,संतोष देशपांडे,मनोहर वायकर व विवेक निघोजकर यांनी मनोगत व्यक्त केले.
शिक्षक सन्मान सोहळ्यात मनोहर वायकर,बबनराव सानप,साईनाथ कनिंगध्वज,मानसी भालेराव,निर्मला भुजबळ,रोहित भागवत,संतोष देशपांडे,संगिता पोखरकर,प्रिया कामत,संतोष खुडे,जयश्री शिंगोटे,विवेक निघोजकर,शितल सुपेकर,वैशाली हांडे व निकिता चव्हाण या 15 शिक्षकांचा फेटा बांधून,सन्मानपत्र,शाल व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष मंगेश मेहेर,हेमंत महाजन,योगेश भिडे,सचिन घोडेकर,माऊली लोखंडे,डॉ.प्रशांत काचळे,फर्स्ट लेडी अमृता जुन्नरकर,निर्मला मेहेर व सिमा महाजन यांनी केले.
यावेळी रोटरी क्लबचे सदस्य भरत चिलप,डॉ.सिमा जाधव,डॉ.केतकी काचळे,वैभव बेनके,छाया गायकवाड,माधवी चिलप,किर्ती मेहेर आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरीचे माजी अध्यक्ष हेमंत महाजन यांनी केले तर आभार रोटरीचे माजी अध्यक्ष मंगेश मेहेर यांनी मानले.



Post a Comment
0 Comments