प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण केंद्र(आय.टी.आय)येथे शारदीय नवरात्रोत्सव व खंडे नवमी निमित्त भारतीय परंपरेनुसार यंत्र पूजन करण्यात आले भारतीय धर्म परंपरेनुसार नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो खंडे नवमीला यंत्र, अवजारे पूजन केले जाते वैद्य डॉक्टरांपासून ते कुशल कारागिरापर्यंत असे पारंपारिक व्यवसायातील लोक दररोजच्या उपयोगातील शस्त्रांची पूजा करतात. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांचा प्रारंभ इत्यादी चांगल्या गोष्टींची सुरुवात केली जाते घर, गाडी, बंगला खरेदी केला जाते . सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केले जातात नवे व्यवसाय चालू केले जातात नवीन नाटके चित्रपट यांचे मुहूर्त होतात पुस्तके प्रकाशित होतात. संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने व यंत्र पूजन करून खंडेनवमी साजरी करण्यात आली. संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके सर यांनी सर्वांना शारदीय नवरात्रोत्सव खंडेनवमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देताना म्हटले की,खंडे नवमी व शारदीय नवरात्रोत्सव हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सोहळा असून या दिवशी देवीचेपूजन, यंत्रपूजन, करून ज्ञान, शक्ती व समृद्धीची प्रार्थना केली जाते. अशा पवित्र उत्सवातून विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त व एकात्मतेचा वारसा मिळतो. या पारंपरिक सणांमुळे अध्यात्मासोबत सामाजिक बंधही अधिक दृढ होतात. या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, परिश्रम व ज्ञानाचा स्वीकार करून प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करावी.
संकुलातील आय.टी.आय विभागाबरोबरच इंजिनिअरिंग, पॉलीटेक्निक, एम.बी.ए, ज्युनिअर कॉलेज, बी.सी.एस, गुरुकुल, फार्मसी लॉ कॉलेज, बी.बी.ए, बी.सी.ए, एम.सी.ए, एम.सी.एस, टाटा मोटर्स, समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, विभागीय प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र आदी सर्वच विभागांमध्ये ही यंत्र आवजारे यांची पूजा मोठ्या आनंदाने व विधीपूर्वक करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके राजुरी गावचे सन्मा. गणेश हाडवळे, गोरक्षनाथ हाडवळे,सुरेश औटी, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, आय.टी.आयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे, उपप्राचार्य विष्णू मापारी, समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले, पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले, प्रा.संजय कंधारे अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, डॉ. शरद पारखे,समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ. रमेश पाडेकर, यशवंत फापाळे समर्थ नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय सोनवणे,ऐश्वर्या गटकळ,समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर, समर्थ लॉ कॉलेजचे उपप्राचार्य शिवाजी कुमकर,समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे, क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी व उपस्थित मान्यवरांनी यावेळी यंत्र अवजारांचे शस्त्रांची पूजा केली या यंत्र पूजन सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कार्याची निष्ठा, श्रमाचे महत्त्व आणि परंपरेशी नाळ जोडण्याची भावना दृढ झाली. धार्मिक श्रद्धा आणि विज्ञानाची सांगड घालणारा हा उपक्रम यावर्षी संकुलात विशेष ठरला.यंत्रासमोर आकर्षक अशा आणि ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या बोलक्या रांगोळ्यांनी मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले.

Post a Comment
0 Comments