प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त डिसेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेच्या वतीने जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये सलग अकरा दिवस जागर “ती“ च्या आरोग्याचा हा आरोग्यविषयक उपक्रम घेण्यात आला. यामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत ८६७ महिलांची ब्रेस्ट कॅन्सरपूर्व तपासणी व करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी दिली .
पिकांमध्ये केमिकल पेस्टीसाईड चा वापर ,दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वाढता वापर,खाद्य संस्कृती , बदललेली जीवनशैली या सगळ्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे .त्यामुळे डिसेंट फाउंडेशन ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून तपासणी व उपचारबरोबरच समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम देखील करत आहे.
खऱ्या अर्थाने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी स्त्री ही स्वतःच्या आरोग्यकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसते. कँसर सारखा आजार पहिल्या दुसऱ्या अवस्थेत लक्षात आल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो .परंतु तोच जर तिसऱ्या चौथ्या अवस्थेत गेल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते . म्हणूनच या आजाराला रोखण्यासाठी समाजामध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी व्यक्त केले.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी कुळमेथे , डॉ अमेय डोके,डॉ.दयानंद गायकवाड , संस्थेचे सचिव डॉ.एफ.बी.आतार,संचालक आदिनाथ चव्हाण , डॉ.दिप्ती कळमकर,डॉ.योगेश आगम, डॉ.समीर डेरे,डॉ.प्रदीप गोसावी,डॉ प्रियांका बोरा,डॉ शीतल शिंदे, डॉ प्रिया करडीले , डॉ मंगल शेंडे ,तपासणी तज्ञ सपना बेलवटे , मंजिरी भोर यांनी सहकार्य केले .



Post a Comment
0 Comments