Type Here to Get Search Results !

महात्मा ज्योतिराव फुले प्रतिष्ठानच्या वतीने नागरी सत्कार.



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

महात्मा ज्योतिराव फुले प्रतिष्ठान खालचा माळीवाडा सह ताजने मळा यांच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचारी तसेच पदोन्नती झालेल्या व उज्वल या संपादन केलेल्या नागरिकांचा भव्य नागरिक सत्कार गणेशोत्सव निमित्त करण्यात आला असल्याची माहिती महात्मा ज्योतिराव फुले प्रतिष्ठानचे व गौरीशंकर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप ताजणे यांनी दिली.

सदर कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष भारतीताई मेहेर, नगरसेविका सुवर्णाताई बनकर, जुना मुंबई भाजीपाला व्यापारी संघाचे अध्यक्ष कैलास ताजणे, माझी शिक्षणाधिकारी तुळशीराम शिरसाट साई प्रेरणा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक बळीराम थोरात, सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या संचालिका संगीता थोरात, ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष शैलेश बनकर, प्रज्ञा एज्युकेशन हब चे संचालक विलास कडलाक, विश्वास भालेकर, पत्रकार विजय लोखंडे, स्वप्निल लोखंडे,जितेंद्र काळे, महात्मा ज्योतिराव फुले प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष देवराम मेहेर, प्रतिष्ठानचे संचालक मोहन गाडेकर, दत्तात्रय बिडवई, साईनाथ डोके, जितेंद्र चौधरी आदींसह खालचा माळीवाडा सह ताजने मळा येथील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक ,महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



भव्य नागरी सत्कार निमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त विकास अधिकारी भरत मेहेर, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे आदर्श कर्मचारी, राजेंद्र काळे, कृष्णराव मुंढे विद्यालय जुन्नरचे आदर्श सेवक चंद्रकांत ताजणे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबरोबर पुणे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती येथे कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती झालेल्या पूजा दिवेकर व वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या अनुज चौधरी आदींचा सत्कार महात्मा फुले प्रतिष्ठांच्या वतीने करण्यात आला. 

समाजातील सेवानिवृत्त, पदोन्नती तसेच उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार गणेशोत्सवानिमित्त करून महात्मा फुले प्रतिष्ठानने एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला असल्याची भावना यावेळी उपस्थित व्यक्तींनी केली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धेश मेहेर, सूत्रसंचालन प्रवीण ताजणे यांनी, सत्कारमूर्तींचा परिचय अक्षदा गाडेकर यांनी तर आभार संदीप ताजणे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments