मुंबई दि. 8 दलितांवरील अन्याय अत्याचार कमी होण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले जाईल असे मत केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी मांडले आहे. बुलढाणा येथील विश्राम गृह येथे 7 सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॅा.रामदास आठवले यांनी संबोधित करतांना सांगितले की, जिल्ह्यात दलितांवर जो अन्याय किंवा हल्ले होत आहे. यावर सर्वात मोठा उपाय म्हणजे आंतरजातीय विवाह आहे. त्याचा अवलंब मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून देशभर आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले जाईल. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा दिला त्याला यश मिळाले आहे. त्यामुळे मोठ्या कालाविधीनंतर मराठा समाजाला आरक्षणासाठी लढणारा नेता मिळाला आहे. महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी कायद्यात बसविणारे आरक्षण दिले आहे. त्यामुळे आतापर्यंत जे मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले त्यांना आरक्षण देता आले नाही पण ब्राम्हण मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले. ओबीसी समाजाचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेतला नाही. तर मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे कोणाच्याही आरक्षणाला धक्का बसणार नाही असे आरक्षण दिले. काँग्रेसने ओबीसी समाजाचे फसवणूक केली आहे. त्यांचे सरकार असताना त्यांनी जातीय जनगणना केली नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो निर्णय घेतला आहे. विदर्भाचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या व इतर माध्यमातून झाले पाहिजे. एमआयडीसीची जमिन मोकळी न राहता ती कामात आली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक वेळ सरकारला याबाबत माहिती दिली पाहिजे. कारण यामुळे त्यांच्या काय मागण्या आहेत. त्या मागण्या मार्गी लागू शकतात. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती म्हणून एकत्र लढणार आहे. त्यामुळे महायुतीत जेथे निवडून येणार आहे. तिथे आरपीआय चा उमेदवार दिला जाईल. तसेच महाराष्ट्रातील ज्या गायरान जमीनीवर अतिक्रमण केले आहे त्यांचे अतिक्रमण कायम व मालकी हक्काचे झाले पाहिजे त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे तसेच दोन महामंडळ व राज्यमंत्रीमंडळातील रिक्त असलेल्या मंत्रीपदाची मागणी केली आहे. आरपीआयच्या कार्यकर्त्यांसाठी सत्तेत वाटा मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड, आरपीआयचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, आरपीआयचे जिल्हा संपर्कप्रमुख बाबासाहेब जाधव,प्रदेश उपाध्यक्ष रमेश मकासरे, राज्यध्यक्ष मातंग आघाडी अण्णा वायदंडे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार,मरावडानेचे नेते बाळकृष्ण इंगळे देवेंद्र रणपिसे व इतर पदधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Post a Comment
0 Comments