बातमी संकलन : सुमेध सोनवणे
मुंबई, १२ ऑक्टोबर २०२५ - काल पास पोली बीएमसी शाळा, आयआयटी क्षेत्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पवई, मुंबई येथे पांचपीर ट्रस्ट कार्यक्षेत्र भारत यांच्यातर्फे आयोजित तरुण कवी शाम परशुराम बैसाणे यांच्या 'अभिलाषा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक शिवा इंगोले तसेच साहित्य भटू जगदेव, विचारवंत नवनाथ रणखांबे, वकील नाना अहिरे, प्राध्यापिका गीता मोदले आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा बिऱ्हाडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच अनेक निमंत्रित कवी सुद्धा उपस्थित होते.
कार्यक्रमात कविंची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच तरुण कवी शाम परशुराम बैसाणे यांच्या 'अभिलाषा' पुस्तकाच्या कवितांमधून खानदेशी भाषेचा खुराक वाचकांना मिळाला. पुस्तकाची किंमत १४० रुपये आहे.


Post a Comment
0 Comments