प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे मराठी विभागामार्फत दिनांक १०/१०/२०२५ रोजी "अभिजात मराठी भाषा दिनाच्या" निमित्ताने "मराठी अभिवाचनाचा" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखा प्रमुख डॉ.अभिजीत पाटील होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ वंदना नढे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी अभिजात भाषेची संकल्पना, त्याचे निकष आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने होणारे फायदे या सर्व बाबींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
वाणिज्य शाखा प्रमुख डॉ सतिश जाधव यांनीही मराठी भाषेची थोरवी वर्णन करून मुलांनी वाचनाचा छंद जोपासण्याचा सल्ला दिला.अध्यक्षीय मनोगतातून डॉ.अभिजित पाटील यांनी मराठी भाषेची प्राचीनता पटवून देऊन भाषेचे अभिजातपण टिकवायचे असेल तर आपल्या मनामनात ती रुजवली गेली पाहिजे.त्यासाठी असे कार्यक्रम साजरे होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात १२ विद्यार्थ्यांनी मराठी नाटक,कादंबरी,प्रवासवर्णन, कविता अशा अनेक साहित्यकृतींचे अभिवाचन केले.कार्यक्रमासाठी मराठी विभागाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होत.कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी,प्राचार्य डॉ.महादेव वाघमारे,उपप्राचार्य डॉ.रवींद्र चौधरी यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वर्षा देसाई यांनी केले,तर आभार प्रा.विष्णू घोडे यांनी मानले.


Post a Comment
0 Comments