बातमी संकलन- शरद शिंदे
दि 14/10/2025 रोजी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री खंडेराव ढोबळे सर यांची प्रशासकीय बदली झाल्याने आज त्यांना शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले.
खरे तर सुराळे शाळेचा कायापालट करण्यात सरांचा अतिशय सिंहाचा वाटा होता. जिथे जातील तिथे नंदनवन फुलवणारे ढोबळे सर यांनी सुराळे शाळेत आल्यावर शाळेचे रुपडेच बदलून टाकले. शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये अतिशय सुधारणा घडवण्याचे श्रेय हे ढोबळे सरांनाच जाते. शाळेतील वर्गखोल्या, बोलक्या भिंती. शालेय सरंक्षक भिंत. शाळेतील गार्डन निर्माण करण्यात सर सर्वात पुढे. सरांनी भौतिक सुविधांबरोबरच शाळेत गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत देखील वाढ केली. गावासोबत सरांचे अनेक जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. गावातील अनेक तरुणांना सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना व्यवसायात यशस्वी करण्यात सरांचे मोलाचे मार्गदर्शन ठरले आहे.
गावातील ज्येष्ठ नागरिकांसोबत तर सर नेहमीच आदराने बोलून त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या मौलिक मार्गदर्शनाचा उपयोग शाळेसाठी करून घेतात. माझ्यासारख्या कमी अनुभवाच्या शिक्षकाचे सुद्धा सर बऱ्याच वेळा मत ऐकून घेऊन मार्गदर्शन करतात. त्यांचं नेहमीच वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभले आहे. मला अभिमान वाटतो की सरांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची, शिकण्याची संधी मिळाली. सर मी आपला नेहमीच आभारी राहील. गावातील प्रत्येक व्यक्तीचा शाळेच्या विकासात सहभाग करून घेण्यास आपली वक्तृत्व कला वाखाणण्याजोगी आहे.
"तुम्ही आमच्यासाठी जे काही केले, त्यासाठी आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि ज्ञानाबद्दल धन्यवाद."
"तुमची आठवण आमच्या कायम मनात राहील. आम्ही तुम्हाला निरोप देत असलो, तरी तुम्ही नेहमीच आमचे प्रेरणास्थान असाल."
"तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! धन्यवाद!"


Post a Comment
0 Comments