प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
जुन्नर (ता. जि. पुणे) : डिसेंट फाउंडेशन, पुणे आणि माऊली ऑप्टिकल आय केअर सेंटर, जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.८९ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला तर ६१ जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
हे शिबिर बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. भक्तिधाम मंदिर, शिवनेरी पायथा, कुसूर येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी डिसेंट फाउंडेशचे संस्थापक जितेंद्र बिडवई,सचिव डॉ.एफ. बी. आतार, माऊली ऑप्टिकलचे नेत्रतज्ञ विलास बोन्द्रे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश ताजने,मुरलीधर भगत,सदाशिव ताजने, अजित ताजने,अदित्य दुराफे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्तित होते .



Post a Comment
0 Comments