प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने संविधान जागृती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या अभियानाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची माहिती, त्यातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून देणे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, द्वीपप्रजलनाने व पुणे विद्यापीठ गीत वराष्ट्रीय सेवा योजना गीताने करण्यात आली. प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्य आत्मसात करून जबाबदार नागरिक बनण्याचे आव्हान केले. प्रमुख व्याख्याते ऑड.अमेय देशपांडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की संविधान जागृती अभियानाचे उद्दिष्ट म्हणजे तरुण पिढीला संविधानातील मूल्यांची जाण करून देणे, समाजात कायद्याबद्दल आदर निर्माण करणे आणि लोकशाहीची मुळे अधिक बळकट करणे हे आहे. विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास करून त्यातील विचार आत्मसात करावेत, कारण राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारत चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला.
प्रा. अजित झेंडे यांनी संविधान हे आपल्या एकतेचे प्रतीक आहे — विविधतेत एकता, बंधुता, स्वातंत्र्य आणि समानता हीच त्याची खरी ओळख आहे. आपण सर्वांनी "संविधान माझा अभिमान" या भावनेने प्रत्येक दिवस जगण्याचा संकल्प केला, तर निश्चितच आपले समाजजीवन अधिक न्याय्य, सुशोभित आणि सशक्त होईल असे विचार मांडले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय संविधानासंबंधी माहिती व छायाचित्राचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते त्याचप्रमाणे सुंदर संविधान मंदिराची निर्मिती ही विद्यार्थ्यांनी केली होती जे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. संविधान मंदिरातील संविधान प्रतीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमासाठी कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनेश जाधव, प्रा.सोमनाथ गाडेकर, प्रा. अश्विनी खटिंग मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके सर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके यांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारीप्रा. भूषण दिघे यांनी केले तर प्रा. प्रदीप गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment
0 Comments