Type Here to Get Search Results !

माजी विद्यार्थी संघाची उच्छिल येथे दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर स्थापना



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल येथे बुधवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहर्तावर शाळेत दिवाळीच्या अनुषंगाने गावात मुंबई-पुणे व इतर सर्व नोकरदार तसेच व्यावसायिक शेतकरी व पालकवर्ग आणि शालेय सर्व समिती यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक व शाळेचे माजी विद्यार्थी सुदाम आप्पा नवले हे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली सदरची निवड ही बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्थापना करण्यात आली. विद्यार्थी संघ नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे-

माजी विद्यार्थी संघ उच्छिल अध्यक्ष उमेश बबन नवले, उपाध्यक्ष शरद किसन नवले, कोषाध्यक्ष कुंदन सुनिल बगाड, सदस्य निलेश जयराम नवले, सदस्य रमेश मनोहर करवंदे तर शिक्षकप्रतिनिधी सदस्य सुभाष अरुण मोहरे व सचिव स्मिता मिलिंद ढोबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या संघामार्फत भविष्यात शाळेमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक व भावनिक बांधिलकी निर्माण करणे, शालेय विविध समस्यांचे निमूर्लन, लोकसहभाग व शाळेसाठी आर्थिक निधी गोळा करणे यांसह शाळा व त्यांचे ऋणानुबंध घट्ट करणे, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, आपल्या गावाशी व मातीशी संबंध दृढ करणे अशी शासनाची निपक्ष भूमिका आहे. तरी शाळेला गावाचा व गावाला शाळेचा अभिमान वाटावा या उद्दात्त हेतुने शासन निर्णय १ ऑक्टोबर २०२५ च्या नुसार विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या आदेशान्वये संघाची स्थापना दिवाळी पाडव्याला करण्यात यावी असे आदेशित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित उच्छिल शाळेचे माजी विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविताताई किशोर नवले सदस्य शिवाजी नवले, अमोल नवले, कांचन नवले तर अनिल नवले, सचिन नवले, सुनिल नवले, दिनेश नवले, महेश नवले, विमल करवंदे, हिराबाई नवले यांच्यासह गावातील बहुसंख्येने माजी विद्यार्थी पुणे मुंबई सह इतर ठिकाणचे विद्यार्थी गावातील सर्व विद्यार्थी तसेच ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहरे यांनी तर स्वागत स्मिता ढोबळे तर आभार आरती मोहरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments