अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षा तसेच मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या संस्थापक,सचिव, साहित्यिका, कादंबरीकार प्रा.छाया तानबाजी बोरकर यांना त्यांच्या साहित्यिक,शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील विशिष्ट उल्लेखनीय कार्याबद्दल भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्लीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्ड २०२५ जाहीर झाला. हा पुरस्कार १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी दिल्लीतील पंचशील आश्रम जरोडा गाव बोर्डे बायपास येथे आयोजित ४१ व्या राष्ट्रीय विद्यालय साहित्यकार संमेलनात प्रदान केला जाणार आहे.प्रा.छाया बोरकर यांचे अनेक साहित्य प्रकाशित झाले असून ते साहित्य क्षेत्रातील अनेक पदावर पदारूढ आहेत. प्रा.छाया बोरकर या लेखिका असून"मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेच्या अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून व्यावसायिक प्रशिक्षणावर भर देऊन "गावं तिथ शाळा"चालवून बेरोजगारीला आळा घालने,बेरोजगार वंचित घटकांना रोजगार प्राप्त करून उदरनिर्वारला हातभार लावलेले आहे.
भारतीय दलित साहित्य अकादमी सदस्य विदर्भ प्रदेश अध्यक्ष लेखक रवी दलाल यांनी निवड समिती मार्फत पत्राद्वारे कळविले आले.

Post a Comment
0 Comments