प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा महाविद्यालयातील *उदय शिंदे* आणि *जयश्री कोकणे* या दोन खेळाडूंची दिनांक १८ऑक्टोबर २०२५ रोजी श्रमिक ज्युनिअर कॉलेज संगमनेर येथे पार पडलेल्या विभागीय हॅण्डबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरीच्या जोरावर माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालय सेक्टर 9 कामोठे,पनवेल येथे होणाऱ्या २८,२९,३०ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या *राज्यस्तरीय* हॅण्डबॉल स्पर्धेकरिता निवड झाली.त्या बद्दल जिमखाना विभागाचे व विद्यार्थ्यांचे जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे यांनी विद्यार्थ्यांचे व जिमखाना विभाग प्रमुख प्रा मयुर बोंबले संराचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी,
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे,उपप्राचार्य डॉ.आर.डी.चौधरी,ज्युनिअर महाविद्यालयाच्या समन्वयक व उपप्राचार्या प्रा.पी.एस.लोढा पर्यवेक्षक प्रा.एस.ए.श्रीमंते एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा.के.जी.नेटके, वरिष्ठ जिमखाना विभाग प्रमुख डॉ.ए.के बडे सर्वांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments